चंद्रपूर - मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे यांना कोणी शब्द दिला होता, हे सध्यातरी माहीत नाही. जर शब्द दिला असेल तर तो पाळला पाहिजे, दिला नसेल, तर त्यावर चर्चा नको, अशी भूमिका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. तसेच 'तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है' असाच या मुलाखतीचा सारांश असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर राग नाही, तक्रार आहे. युती तुटल्यानंतर देखील भाजप आणि सेना कार्यकर्त्यांचा आणखीही स्नेह आहे. तर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सामनाच्या मुलाखतीतून दोन्ही पक्षांमधील स्नेह कायम असल्याचे अधोरेखित होत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेची गेली 30 वर्ष युती होती. शिवसेना आणि भाजपने नेहमी विचारांवर आणि विचारांसाठी काम केले. ‘एक विचार एक सूर’ हे या युतीचे वैशिष्ट होते. दरम्यानच्या काळात काही घटना घडल्या. पण, उद्धव ठाकरेंच्या एकूण मुलाखतीचा सार काढला तर तो ‘तू यार है किसी और का... तुझे चाहता कोई और है, असाच निघतो, असे मुनगंटीवार म्हणाले.