चंद्रपूर - जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उभ्या विंगर गाडीला अचानक आग लागण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या आगीत विंगर गाडी जळून खाक झाली आहे. शहरातील मुख्य मार्गावरील बालाजी वार्ड परिसरात कैलास खंडेलवाल यांच्या मालकीची ही गाडी त्यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती. या आगीचे कारण मात्र अद्याप अज्ञात आहे. स्थानिकांनी बल्लारपूर नगरपालिकेला आगीची माहिती दिली. मात्र अग्निशमन वाहन येण्याआधीच वाहनाची राख झाली.
वाळलेला कचरा जाळल्याने आग लागल्याची शक्यता-
मात्र, पथक येण्यापूर्वी गाडी जळून राख झाली होती. आसपासच्या परिसरात कोणीतरी वाळलेला कचरा जाळल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही गाडी मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती असून सुदैवाने यात प्राणहानी टळली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू आहे.
हेही वाचा- ५ नव्या पाहुण्यांच्या आगमनाने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात उत्साह