ETV Bharat / state

असेही रामलखन, एक झाला अधिकारी तर दुसऱ्याची ख्याती पोहोचली सातासमुद्रापार - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

चंद्रपुरातील भद्रावती येथील दोन सख्ख्या भावांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मोठा भाऊ एमपीएससीची परीक्षा पास करून अभियंता झाला तर दुसऱ्याने लेदर डिझायनिंग या क्षेत्रात सातासमुद्रापार ख्याती मिळवली आहे. संकेत माथनकर आणि अनिकेत माथनकर अशी या भावांची नावे आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 21, 2022, 8:31 PM IST

चंद्रपूर - चंद्रपुरातील भद्रावती येथील दोन सख्ख्या भावांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मोठा भाऊ एमपीएससीची परीक्षा पास करून अभियंता झाला तर दुसऱ्याने लेदर डिझायनिंग या क्षेत्रात सातासमुद्रापार ख्याती मिळवली आहे. संकेत माथनकर आणि अनिकेत माथनकर अशी या भावांची नावे आहेत.

असेही रामलखन

संकेत आणि अनिकेत यांचे वडील हे मांगली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. संकेत माथनकर याचे दहावी पर्यंतचे शिक्षण भद्रावती येथील एका शाळेत झाले. तर बारावी त्याने नागपूर जवळील बुट्टीबोरी येथून केले. यानंतर स्थापत्यशास्त्र या विषयात त्याने औरंगाबाद येथील महाविद्यालयातून झाले. यानंतर हैदराबाद येथे जाऊन त्याने उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठीच्या निवडचाचणी गेट (GATE) साठी एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर 2017 ला पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. लहान भाऊ अनिकेत हा तेव्हा नुकताच दहावी झाला होता. त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. मात्र, कलेची त्याला फार मोठी आवड होती. ही बाब संकेतच्या लक्षात होती. त्यामुळे त्याच्या कलेला तंत्राचे पंख देण्यासाठी संकेतची पायपीट सुरू झाली. भारती विद्यापीठात फाउंडेशन नावाचा अभ्यासक्रम होता ज्यात डिझायनिंगचा पायाभूत अभ्यास होणार होता. या अभ्यासक्रमात अनिकेत तल्लीन झाला. इंजिनिअर आणि डॉक्टरच्या पलीकडे काही जग असते हे त्याला यावेळी कळले. यानंतर एमआयटी महाविद्यालयातून त्याने बारावी पूर्ण केली.

दोन भावांचे यश -लहान भाऊ अनिकेतने बारावी पूर्ण झाल्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयारी केली. 2020ला चेन्नई येथील संस्थेत त्याची निवड झाली. बॅचलर इन डिझाईन या विषयावर चार वर्षांचा अभ्यासक्रम तो पूर्ण करीत आहे. सध्या तो दुसऱ्या वर्षांत आहे. याच दरम्यान एका स्पर्धेची माहिती त्याला मिळाली. जागतिक स्तरावर लेदर बॅग डिझाईनवर एक स्पर्धा भरवली जाते. त्यात अशा डिझाइन मागविण्यात येतात आणि अंतिम तीन डिझाईनची निवड केली जाते. अनिकेतच्या एका मित्राने यापूर्वी या स्पर्धेत भाग घेतला होता. 'मेटा कनेक्ट' या नावाची थीम घेऊन अनिकेतने आपली डिझाईन पाठविली होती. त्याची अंतिम 30 उत्तम डिझाईनमध्ये निवड झाली. यानंतर अंतिम तीन डिझाईनचे सादरीकरण दुबई येथे होणार होते ज्यात अनिकेतची निवड झाली. अंतिम तीनमध्ये निवड झल्याने अनिकेतला इटली मिलान येथील लेदर डिझाईनच्या कंपनीची एक वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या पुरस्काराने अनिकेतने जगाचे लक्ष आपल्याकडे वळविले आहे. तर मोठा भाऊ संकेतने नुकतेच एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. जलसंपदा विभागात सहायक अभियंता म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. मात्र, यात संकेत समाधानी नाही. त्याला सहायक अतिरिक्त अभियंता या पदाची नोकरी मिळवायची आहे, त्यासाठी तो आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

तिराणीक सरांच्या कला अकादमीने बदलले जग - भद्रावती सारख्या छोट्या शहरात रवींद्र तिराणीक यांची कला अकादमी आहे. लहान मुलांच्या कलागुण विकासासाठी ही अकादमी नंदनवन ठरली आहे. पेंटिंग, ड्रॉइंग, हस्तकला, शिल्पकला या सर्व कलेचे बाळकडू येथेच दिले जाते. संकेत आणि अनिकेत यांच्या विश्वाला येथेच मूर्तरूप प्राप्त झाले. अभ्यासात हुशार नसलेल्या अनिकेतला येथून कलेची आवड निर्माण झाली. त्याचा कलात्मकता आणि कल्पकतेचा पाया येथेच रचला गेला. तर संकेतला जिवन जगण्याची कला येथेच गवसली. म्हणून मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यश येत नसताना त्याने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. पुण्यात त्याला फुटबॉलमध्ये रस निर्माण झाला. त्यामुळे त्याच्यात खिलाडूवृत्ती निर्माण झाली. मात्र या सर्व गोष्टींचा पाया हा तिराणीक सरांच्या कला अकादमीतच तयार झाला असे संकेत सांगतो.

हेही वाचा - ...तर नकोय मला जाती-धर्म; जाती-धर्म विरहित प्रमाणपत्रासाठी युवतीचा संघर्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.