ETV Bharat / state

भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा राजुऱ्यातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल - राजुरा येथील ब्रिटिशकालीन रेल्वेपूल

हैदराबाद मुक्ती लढ्यात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष असणारा राजुरा येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल दिमाखात उभा आहे.

British era railway bridge Rajura Chandrapur
ब्रिटिशकालीन रेल्वे पूल राजुरा चंद्रपूर
author img

By

Published : Jun 2, 2020, 4:01 PM IST

राजुरा (चंद्रपूर) - भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हैदराबाद संस्थानात असलेल्या राजुरा तालुक्याला स्वातंत्र होण्यासाठी तब्बल 13 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. निजामांच्या जुलमी राजवटीतून राजुरा क्षेत्र 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाले. मात्र, त्यासाठी भारतीय सैन्याने सर्वप्रथम दक्षिणेकडे हैदराबाद संस्थानाला जोडणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलावरून चढाई केली. रझाकारांना सळो की पळो करून सोडले. याच रेल्वे पुलाला बॉम्बने उडवून टाकण्याची योजना रझाकारांनी आखली होती. परंतु भारतीय सैन्याने वेळेअगोदर पुलावरून कूच केली आणि रझाकारांना धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल आजही राजुरा येथे दिमाखात उभा आहे.

भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल आजही राजुरा येथे दिमाखात उभा...

हेही वाचा... जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये दोन दहशतवादी ठार..

जवळपास 500 मीटर लांब, 14 पिलर आणि नदीपात्रातून 23 ते 24 मीटर उंच असा हा पूल आजही भक्कम अवस्थेत आहे. महत्वाचे म्हणजे, या पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे अद्याप निखळलेले नाहीत. पुलाचे पिलर (खांब) हे दगड आणि चुनखडीने बांधलेले आहेत. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अनेक पूर, पाऊस, वादळ वारा सहन केलेला हा रेल्वे पूल भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देतो.

देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेस जवळपास 565 संस्थानांचे विलिनीकरण ही आधुनिक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. हैदराबाद, जुनागड आणि जम्मू-काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन होण्यासाठी अनुकूल नव्हती. त्यावेळी देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी याबाबत महत्त्वाची भूमिका निभावली.

भारतात विलिनीकरणास नकार दिल्यानंतर निजामाच्या सत्तेविरुद्ध भारतीय सैन्याने राजुरा येथील याच रेल्वे पुलावरून आगेकूच केली होती. त्यावेळी बल्लारपूर हे शेवटचे रेल्वेस्थानक होते. वर्धा नदीच्या पलीकडे निजामाचे राज्य होते. वर्धा नदीच्या पुलावरून भारतीय सैनिक घुसणार असल्याची माहिती रझाकारांना मिळताच, त्यांनी हा पूल उडवण्याचा बेत आपला होता. मात्र, नियोजित वेळेत अगोदरच भारतीय सैन्याने पुलावरून कूच केली आणि रझाकारांचा पराभव केला. राजुरा क्षेत्रात भारतीय सैन्याने प्रवेश करून निजामाच्या जुलमी सत्तेचा जो अस्त केला, त्याचाही हा पूल साक्षीदार असल्याचे इतिहास अभ्यासक आनंद चलाख यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.