चंद्रपूर - आज मुंबई येथे राणा दाम्पत्य व शिवसेनेमध्ये चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa Controversy) करण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद राजुरा शहरात उमटले आहेत. शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयासमोरील पार्टीच्या फलकाची तोडफोड केली (ShivSainiks attack Yuva Swabhiman Party office in Rajura) आहे. जवळपास १०० च्या आसपास शिवसैनिकांना पार्टी कार्यालयावर हल्ला केला. दरम्यान, आज मुंबईत खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक (Rana Couple arrested by Khar Police) केली आहे.
हेही वाचा - Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...
युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार - शिवसैनिकांनी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावरून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे फोटो असलेले फलक खाली फेकून तोडफोड केली. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे हे मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण? - मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य लपून मुंबईत दाखल झाले होते. तसेच येथे पत्रकार परिषद घेऊन आज मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत दोघांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.
हेही वाचा - Rana Couple Vs Shiv Sena : राणा दाम्पत्याला अखेर अटक; सकाळपासून मुंबईत रंगले आंदोलन, प्रतिआंदोलनाचे नाटक