ETV Bharat / state

Chandrapur Agriculture Dept : बियाणे घेतले मात्र उगवलेच नाही; कृषी विभागाने 307 नमुने तपासणीसाठी पाठवले

चंद्रपूर येथील शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी केली, पण हे बियाणे उगवलेच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातून अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाने ( Chandrapur Agriculture Department ) अशा 307 बियाणे आणि खतांचे नमुने परीक्षणासाठी पाठविले आहेत, त्यात त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब भरते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Chandrapur Agriculture Dept
सोयाबिन पीक
author img

By

Published : Jul 2, 2022, 6:35 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करतोय. जुलै महिना आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही, अशा कठीण काळात जोखीम घेत काही शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी केली, पण हे बियाणे उगवलेच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातून अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाने अशा 307 बियाणे आणि खतांचे नमुने परीक्षणासाठी पाठविले आहेत, त्यात त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब भरते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. ( Seeds did not germinate in Chandrapur )

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

अहवाल आल्यानंतर कारवाई - यंदा जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. थोड्याबहुत पावसाच्या भरोवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, अनेक बियाणे उगवलेच नाही. जिल्हाभरातून शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्याअनुशंगाने कृषी विभागाने बियाणे आणि खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. बियाण्यांचे नमुने नागपुरातील बीज परीक्षण प्रयोगशाळेत, तर खतांचे नमुने अमरावती येथील रासायनिक खत विश्लेषक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नमुन्यांचा अजूनही अहवाल मिळाला नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाईची दिशा ठरेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई - जिल्हाभरातील शंभरावर शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या लेखी स्वरुपातील तक्रारी कृषी विभागाकडे केल्या होत्या. याच तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने बांधावर जाऊन भेट ते बियाण्यांची पाहणी केली. या भेटीदरम्यान सोयाबीन, कापूस, धान आणि तुरीच्या बियाण्यांचे नमुने घेतले. जवळपास ३०७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. १०३ खतांचे नमुने तपासणीसाठी कृषी विभागाने घेतले आहेत. त्यात १८ः १८ः १०, २० :२०ः२०ः ०१३, सुपर फास्फेट, डीएपी आणि एमओपी या खतांचा समावेश आहे. बियाण्यांचे नमुने नागपुरातील बीजपरीक्षण प्रयोगशाळेत, तर खतांचे नमुने रासायनिक खत विश्लेषक प्रयोगशाळा अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचा तपासणीचा अहवाल अजूनही प्राप्त झाला नाही. येत्या आठ- दहा दिवसांत घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर बियाणे न उगविण्याचे कारण समोर येऊ शकते, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. त्यात काही त्रुट्या आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक भरते यांनी दिली.

विक्रांत कंपनीच्या सर्वाधिक तक्रारी - चंद्रपूर जिल्ह्यातुन ज्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत त्यात विक्रांत नावाची बियाणे कंपनीचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा - Maha Assembly Speaker Election : महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लढवणारे राजन साळवी आहेत कोण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.