चंद्रपूर - राजुरा वनपरिक्षेत्रात आठ नागरिकांचे बळी घेणाऱ्या आरटी-1 वाघ हा वाघ पिंजऱ्यातुन पळून गेला असून या वाघाला पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे. मात्र, हा वाघ वारंवार हुलकावणी देत आहे. या वाघासाठी अमिश असलेला पिंजरा लावण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हा वाघ येथे आला, तो पिंजऱ्यात अडकला देखील होता. मात्र, पिंजऱ्याचे दार वाकवून हा वाघ पळ काढण्यात यशस्वी झाला. वनविभागाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.अशावेळी हा महत्वाचा प्रयत्न फसल्याने वनविभागाला त्याला पकडण्यासाठी आता वेगळे नियोजन करावे लागणार आहे.
आरटी-1 वाघाने या क्षेत्रात आठ लोकांचा बळी घेतल्याने येथे मानव-वन्यजीव संघर्षाने टोकाची पातळी गाठली आहे. येथील नागरीकांमध्ये कमालीचा रोष आहे. वाघाला पकडण्यासाठी राजकिय दबाव देखील वाढत चालला आहे. या वाघाचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह शूटर देखील बोलाविण्यात आले आहेत, वाघाच्या नेहमीच्या मार्गावर दोन ठिकाणी पिंजरे पिंजरे लावण्यात आले आहेत, सोबत सीसीटीव्ही आणि ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहे. असे असतानाही मागील आठ महिन्यांपासून हा वाघ वनविभागाला हुलकावणी देत आहे. एक हजार हेक्टर परिसरात पसरलेले विस्तीर्ण जंगल, त्यात असलेले अडथळे यामुळे वाघाला पकडण्यासाठी मोठा अडसर ठरत आहे. या वाघाचा नेहमीचा रस्ता असलेल्या पुलाखाली पिंजरा लावण्यात आला आहे, त्याला आकर्षित करण्यासाठी तिथे शिकार ठेवण्यात आली आहे. मात्र, या पिंजऱ्याचे दार दोराने खेचून खाली पाडण्याची त्यापासून दूर दुसरा पिंजरा ठेवण्यात आला होता. त्या दुसऱ्या पिंजऱ्यात वनकर्मचारी ठेवण्यात येत होते. मात्र काही दिवसांतच हा वादाचा मुद्दा झाला आणि दुसऱ्या पिंजऱ्यात वनकर्मचारी ठेवणे बंद करण्यात आले आणि त्याजागी स्वयंचलीत तंत्र वापरण्यात आले. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा आरटी-1 वाघ पिंजऱ्यातील शिकार बघून त्यात आला होता. तो पिंजरा बंद झाला, मात्र आपण पिंजऱ्यात अडकलो याची चाहूल लागताच शिकार सोडून या वाघाने पिंजऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यातून तो कसाबसा निसटला. या घटनेला उपविभागीय वनाधिकारी अरविंद मुंडे यांनी दुजोरा दिला आहे.
आरटी-1 वाघ पिंजऱ्यातुन पळाला; वनविभागाची डोकेदुखी वाढली - चंद्रपूर आरटी 1 वाघ बातमी
वाघ पकड्यासाठी पिंजऱ्याचा प्रयत्न फसल्याने आता वनविभागाला या वाघाला पकडण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे. दिवसेंदिवस दबाव वाढत असल्याने या वाघाला तातडीने जेरबंद करणे आता गरजेचे झाले आहे.