चंद्रपूर - काल चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला. काही नागरिकांनी या रुग्णाचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. रुग्णाची ओळख कुठल्याही माध्यमांवर जाहीर न करण्याचे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, झालेल्या प्रकारावरून नागरिकांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
काल शहरातील कृष्णनगर येथील एक ५० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण आहे. या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर या कोरोनाबाधित व्यक्तीचा अहवाल टाकला आहे. अहवालात रुग्णाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे, शासनाच्या आवाहनाची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी जबाबदार नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा- तेलंगणातून चंद्रपूरात परतलेल्या मजूरांचा घरी जाताना जीवघेणा प्रवास