ETV Bharat / state

Ballarpur Bridge : बल्लारपूर पुल कोसळण्याच्या घटनेवर कमिटी सदस्याच्या एकाच प्रश्नावर रेल्वे अधिकारी निरुत्तर - ballarpur bridge update

सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र.01 व 02 पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. हे अधिकारी येथे असताना रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या झेडआरयुसीसी कमिटीचे सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी अधिकाऱ्यांसमोर जो प्रश्न विचारला ( committee member question to Railway officials ) ज्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट न करताच पुलाची दुरुस्ती ( ballarpur bridge structural audit committee ) कशी काय करण्यात येत आहे

बल्लारपूर पूल
बल्लारपूर पूल
author img

By

Published : Nov 29, 2022, 7:51 AM IST

चंद्रपूर : दक्षिण भारताला जोडणाऱ्या बल्लारशा (बल्लारपूर) रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मला जोडणाऱ्या अंतर्गत पुलाचा काही भाग रविवारी कोसळला. याची गंभीर दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्रीच चंद्रपूर ( Repair of ballarpur bridge ) गाठले. कोसळलेला पूल त्वरित सुरू व्हावा म्हणून बड्या अधिकाऱ्यांनी बल्लारशा रेल्वे स्थानकावर तळ ठोकला आहे. यात डीआरएम ऋचा खरे, एडीआरएम जयसिंग व सिनियर डिसीएम कृष्णांत पाटील यांचा समावेश आहे.

सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र.01 व 02 पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. हे अधिकारी येथे असताना रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या झेडआरयुसीसी कमिटीचे सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी अधिकाऱ्यांसमोर जो प्रश्न विचारला ( committee member question to Railway officials ) ज्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट न करताच पुलाची दुरुस्ती ( ballarpur bridge structural audit committee ) कशी काय करण्यात येत आहे, यावर सर्व अधिकारी निरुत्तर झाले. यावरून पुन्हा एकदा मध्यरेल्वेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.रेल्वे विभागाने सद्या हा पूल पूर्णतः बंद केला असून सर्व प्लँटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेच्या अप(चंद्रपूरकडे)दिशेने प्लॅटफॉर्म संपतो तेथे पाथ-वे तयार केला असून सोमवारी दिवसभर या मार्गाचा वापर प्रवाश्यांनी केला.

50 वर्षे जुन्या पुलाला जोडला नवा भाग सूत्राने दिलेल्या माहितीनुसार किमान 50 वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्र 01 व 02 साठी पुलाची निर्मिती करणयात आली.या पुलास जोडून किमान 15 वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्र.3,4,व5 साठी नवीन पूल उभारण्यात आला.रविवारी जुन्यापुलाचा काही भाग कोसळला व यात 14 प्रवासी जखमी झाले आणि एका महिलेला जीव गमवावा लागला.या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

म्हणून झाली दुर्घटना किमान 3 वर्षांपूर्वी काझीपेठ-बल्लारशा-पुणे ही नवीन सप्तहिक गाडी सुरू झाली.रविवारी ही गाडी असताना या सोबत केरला एक्सप्रेस, बल्लारपूर-गोंदिया एक्सप्रेस यांचेसह आणखी एक गाडी आऊटर या सर्व गाड्यांचे आगमन काही अंतराने होते. त्यामुळे प्रवाश्यांची मांदियाळी स्थानकावर होती. असे असलेतरी काझीपेठ पुणे गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे सुनुश्चित राहत नाही म्हणून प्रवाश्यांनी पुलावरच गर्दी केली,आणि यातच पुलाचा भाग खाली कोसळला. असे आता बोलले जात आहे.
रेल्वे प्रशासन गुड्स ट्रेन(मालवाहू गाडी)चे कारण सांगून प्लॅटफॉर्म निश्चितीचा विषय टाळतात.त्यामुळे प्रवाश्यांना पुलावर उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.या गाडीसाठी प्लॅटफॉर्म निश्चित करा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वेयात्री संघाने केली आहे.

9 अपघातग्रस्तांवर उपचार खाजगी इस्पितळात सुरू रेल्वेचे एडीआरएम जयसिंग चंद्रपुरात रविवारी रात्री दाखल झाल्यावर त्यांनी उपचाराचा खर्च रेल्वे देणार अशी घोषणा केली.त्यामुळे बहुतांश लोकांनी आपल्या अपघातग्रस्त स्वकीयांना खाजगी इस्पितळात भरती केले.सद्यस्थितीत 9 अपघातग्रस्तांवर डॉ.मानवटकर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.यातील रंजना खरतड यांची प्रकृती अत्यन्त गंभीर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.