ETV Bharat / state

Hello RTO Help Desk In Chandrapur : चंद्रपुरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचा 'हॅलो आरटीओ मदत कक्ष' - उपप्रादेशिक परिवहन विभाग

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात 15 तालुके येतात. त्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘हॅलो आरटीओ’ असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला ( Hello RTO Help Desk In Chandrapur ) आहे.

Hello RTO Help Desk In Chandrapur
Hello RTO Help Desk In Chandrapur
author img

By

Published : Mar 3, 2022, 9:42 PM IST

चंद्रपूर - उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात 15 तालुके येत असून मुख्यालयापासून इतर तालुक्यांचे अंतर लक्षात घेता वाहनधारकांना विविध कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘हॅलो आरटीओ कक्ष’ असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला ( Hello RTO Help Desk In Chandrapur ) आहे.

परिवहन विभागाच्या सेवा जसे लायसन्स, वाहनांचा कर भरणे, वाहन हस्तांतरण करणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे, परवाना इत्यादी कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचे अंतर लक्षात घेता प्रत्येक वेळी वाहनधारकास कार्यालयातील कामासाठी किंवा अन्य माहितीसाठी/अडचणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन परिवहन विभागाने 07172272555 हा क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास नागरिकांची वेळेची बचत होणार असून, मध्यस्थाद्वारे होणारी फसवणूक टाळता येणे शक्य आहे.

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती

परिवहन विभागाच्या संबंधित कामाकाजाचे ऑनलाईन अर्ज करताना प्रत्येक कामाचे चार्ट पुरवण्यात येतील. कार्यालयात येण्यापूर्वी कार्यालयीन कामाकाजासाठी आवश्यक प्रत्येक दस्ताऐवज माहिती व्हॉट्सॲपद्वारे प्राप्त होईल. वाहनधारकांना पडणाऱ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे तसेच ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणीबाबत माहिती उपलब्ध होईल. थकीत वाहन कर व पर्यावरण कर धारकांना मागणी पत्र या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे पाठवण्यात येणार आहे. तर, थकीत कर वसुलीसाठी कार्यालयीन क्रमांकाचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा - Budget Session 2022 : भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा आक्रमक; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारविरोधात घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.