ETV Bharat / state

Ramdas Athawale : 'बार्टीच्या केंद्रात भ्रष्टाचार होत असेल तर ही गंभीर बाब' ; रामदास आठवले यांचे कारवाईचे आश्वासन - बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट

चंद्रपूर येथील बार्टीच्या केंद्रात (BARTI Chandrapur) विद्यार्थ्यांचे होणारे शोषण आणि गैरव्यवहार ईटीव्ही भारतने उघड केला होता. (corruption in BARTI Chandrapur). याचा सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला. ही बाब आठवले यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Athawale on corruption in BARTI).

Ramdas Athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Jan 8, 2023, 10:20 PM IST

रामदास आठवले

चंद्रपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना समान संधीचा न्याय मिळवून देण्यासाठी बार्टी (बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट) ची स्थापना करण्यात आली. (BARTI Chandrapur). मात्र अशा केंद्रात जर विद्यार्थ्यांचे शोषण आणि भ्रष्टाचार होत असेल तर ही गंभीर बाब आहे. याबाबत आपण जातीने लक्ष घालणार असून बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये आणि मुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिले आहे. (Ramdas Athawale on corruption in BARTI).

बार्टीच्या केंद्रात गैरव्यवहार ईटीव्ही भारतकडून उघड : चंद्रपूर येथील बार्टीच्या केंद्रात विद्यार्थ्यांचे होणारे शोषण आणि गैरव्यवहार ईटीव्ही भारतने उघड केला होता. याचा सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला. ही बाब आठवले यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता पुढे नेमकी कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (corruption in BARTI Chandrapur).

काय आहे प्रकरण? : चंद्रपुरात अनुपमा बुजाडे यांच्या संस्थेकडे बार्टी केंद्र चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र येथे विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते, तसेच बार्टीकडून येणाऱ्या निधीत गैरव्यवहार केला जातो, अफरातफर केली जाते, येथे विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया देखील आपल्या मर्जीनुसार केली जाते, बार्टीला खोटी माहिती पुरवली जाते, असे अनेक गंभीर आरोप या संस्थेवर होत आहेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट 2022 मध्ये हे प्रशिक्षण पार पडले. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांचे मानधन अजून मिळालेले नाही. यातील पहिल्या महिन्यातील मुलांचे तांत्रिक कारणामुळे मानधन अडले तर सहाव्या महिन्यातील काही मुलांना बाहेर निरोपसमारंभ केल्यामुळे जाणीवपूर्वक अनुपस्थित दाखवून मानधन रोखण्यात आले. अशा विद्यार्थ्यांनी समोर येऊन ईटीव्ही भारतजवळ आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल वाचा फोडली होती. ही बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित करताच खळबळ उडाली होती. यानंतर चौकशी लागल्यास मोठे घबाड समोर येणार या भीतीने संचालिका अनुपमा बुजाडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू असताना चोरखिडकी येथील केंद्र लोकमान्य टिळक शाळेसमोर हलवले. ईटीव्ही भारतने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि आपले मानधन देण्याचा तगादा त्यांनी लावला. पण अनुपस्थित दाखवल्याने या विद्यार्थ्यांना बार्टीकडून मानधन मिळणे शक्य नव्हते. पण हे विद्यार्थी देखील बंड करून आपल्या विरोधात भूमिका घेतील या भीतीने संचालिकेने स्वतःच्या खिशातून ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली. तसेच आपण याबाबत कुणालाही वाच्यता करणार नाही, प्रसार माध्यमासमोर जाणार नाही असे लिहून घेतले असल्याची माहिती पीडित विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथे किती भोंगळ कारभार सुरू आहे हे लक्षात येते.

आधी चौकशीचे आश्वासन आता घुमजाव : बार्टी केंद्रात विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत ईटीव्ही भारतने वृत्त प्रकाशित केले असता, बार्टी केंद्राचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ईटीव्ही भारतने येथे चालणाऱ्या गैरव्यवहाराबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित केले. मात्र चौकशी करण्याऐवजी त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वारंवार संपर्क करूनही त्यांनी कुठलाही प्रतिसाद देण्याचे टाळले. अशा गंभीर प्रकरणाला पाठीशी घालण्यात त्यांचा नेमका काय रस आहे हे कळायला मार्ग नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.