ETV Bharat / state

Ramdas Athawale : आम्हाला विश्वासात न घेता जोगेंद्र कवाडेंना युतीत घेतले; रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत - रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (RPI President) तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) हे आज एका कार्यक्रमानिमित्त चंद्रपुर येथे (Chandrapur) आले होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच आम्हाला विश्वासात न (expressed regret) घेता पीपल रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष (PRP President) प्रा. जोगेंद्र कवाडे (Professor Jogendra Kawade) यांना युतीत घेतले. आणि या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Ramdas Athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Jan 8, 2023, 6:30 PM IST

प्रतिक्रिया देतांना रामदास आठवले

चंद्रपूर : पीपल रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष (PRP President) प्रा. जोगेंद्र कवाडे (Professor Jogendra Kawade) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत घेतले. तसे जाहीर देखील करण्यात आले. मात्र, घटकपक्ष म्हणून आरपीआय पक्षाला विश्वासात न घेता, आमच्याशी चर्चा न करता हे पाऊल उचलण्यात आले, अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (RPI President) तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी व्यक्त (expressed regret) केली. ते आज एका कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आठवले यांनी व्यक्त केली खंत : एखाद्या पक्षात कोणाला घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजप बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय अशी महायुती आहे. त्यामुळे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना या युतीत सामील करताना आणि त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. मात्र, तसेच झाले नाही अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. असे करताना भाजपला देखील विश्वासात घेतले होते की नाही, याबद्दल देखील त्यांनी शंका व्यक्त केली.

कवाडे यांचे महायुतीत स्वागत : कुठल्याही पक्षाला युतीमध्ये घेताना घटक पक्ष म्हणून विचारणा व्हायला हवी. विशेषता दलित समाजामधून कुणाला घ्यायचे असल्यास आमच्याशी चर्चा करायला हवी. जोगेंद्र कवाडे यांचे महायुतीत स्वागत आहे. मात्र ते आल्याने महायुतीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही, म्हणजे याचा फायदा महायुतीला होईल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा करणार : कवाडे यांच्याबाबत घोषणा झाली असताना नागपुरात राज्याचे अधिवेशन सुरू होते. तर मी दिल्ली येथील अधिवेशनात व्यस्त होतो. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. मात्र, या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. यावरुन आठवले यांची दखल न घेतल्याची नाराजी स्पष्ट दिसुन येत आहे.

नेता कोणीही असो महापुरुषांबद्दल बोलताना भान ठेवा : महापुरुषांबद्दल बोलताना त्यांचा अवमान होणार नाही, याचे भान असणे आवश्यक आहे. मग तो नेता किती मोठा आहे किंवा त्याचे किती मोठे पद आहे, त्याला काही महत्त्व नाही. मात्र आपण बोलताना महापुरुषांबद्दल काय बोलतो आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. महापुरुषांची बदनामी टाळली पाहिजे आणि याचं सर्वांनी अनुकरण करायला हवं, असं म्हणत आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.