ETV Bharat / state

'इन्स्टाग्राम'वर एक मेसेज आला अन् युवा कलाकाराच्या आयुष्यात भरले 'रंग'; अथर्वचं 'असे' पालटलं जीवन - रॅमन मॅगसेसे पुरस्कार

Raman Magasasay Foundation Work : आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे फाउंडेशनच्या अनोख्या पुस्तिकेसाठी पेंटिंग तयार करण्याची जबाबदारी चंद्रपूर येथील युवा कलाकार अथर्व बारापात्रे याला मिळालीय. जाणून घेऊ, याविषयी सविस्तर

Raman Magasasay Foundation Work
Raman Magasasay Foundation Work
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 7:36 AM IST

Updated : Jan 14, 2024, 7:43 AM IST

युवा कलाकार अथर्व बारापात्रे

चंद्रपूर Raman Magasasay Foundation Work : रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजला जातो. अत्यंत असाधारण कार्य आणि योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळं या पुरस्काराची प्रतिष्ठा लक्षात येते. या वर्षी रॅमन मॅगसेसे फाउंडेशनकडून अनोख्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे. आजवर ज्या महान व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे, अशा सर्वांच्या पेंटिंग्ज या स्मरणिकेत असणार आहेत. या पेंटिंग तयार करण्याची जबाबदारी चंद्रपूर येथील युवा कलाकार अथर्व बारापात्रे याला मिळालीय. चंद्रपूरच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जातोय.

सात खंडात निघणार स्मरणिका : रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1958 पासून हा पुरस्कार सुरू झाला. या पुरस्काराला 64 वर्षे झाली आहेत. शासकीय सेवा, समाजसेवा, सामाजिक नेतृत्व, साहित्य-पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि शांतता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत शंभराहून अधिक विभूतींना हा पुरस्कार देण्यात आलाय. या सर्वांचा स्मरणिकेत समावेश असणार आहे. मात्र सर्वांचा समावेश एका स्मरणिकेत होणं शक्य नसल्यानं सात खंडात या स्मरणिकेचं काम होणार आहे. याचं काम सध्या अथर्व करतोय.

अशी मिळाली जबाबदारी : अथर्व स्थापत्यशास्त्राच्या तिसऱ्या वर्षात असताना अचानक रात्री त्याच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल आला. यादरम्यान फसवणूक करणारे अनेक कॉल्स येत असल्यानं त्यानं तो कॉल टाळला. यानंतर पुन्हा एकदा कॉल आला. मात्र, याही वेळी त्यानं तो उचलला नाही. अथर्व हा इन्स्टाग्रामवर आपल्या केलेल्या कामासंबंधी अनेक पोस्ट टाकत असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला की," मला तुझं काम आवडतं तू माझ्यासाठी काम करशील का? त्यानं लगेच होकार दिला. यानंतर त्याला मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये बैठकीसाठी बोलावण्यात आलं. यावेळी तिथं रॅमन मॅगसेसे फाउंडेशनची टीमदेखील होती. मात्र याची पुसटशी कल्पना देखील अथर्वला नव्हती. त्यांनी अथर्वला 57 पेंटिंग्ज तू करु शकशील का? असं विचारलं. त्यानं हे काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ मिळणार असे विचारलं असता त्याला तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला. अशा पद्धतीनं त्याला हे काम मिळालं.

तीन पिढ्यांचा वारसा : अथर्वचे आजोबा विनायकराव पेंटर चंद्रपूर येथील नावाजलेले चित्रकार होते. वडील सुदर्शन बारापात्रे यांची महाराष्ट्रातील चित्रकार अशी ओळख आहे. तसंच ते खासगी शाळेत कला शिक्षकदेखील आहेत. आजोबा आणि वडील यांची चित्रकला बालपणापासून अथर्व बघत होता. त्यामुळं या कलेचं त्याच्यावर बालपणापासून संस्कार झाले. आता मात्र अथर्वची ख्याती सातासमुद्रापार गेलीय. तसंच नुकतेच प्रदर्शित झालेले आणि गाजलेले चित्रपट म्हणजे हंबीरराव आणि धर्मवीर आहेत. या दोन्ही चित्रपटाचे पोस्टर अथर्वनं तयार केले आहेत. या सोबतच अनेक वेब सिरीजच्या पोस्टरचं कामदेखील अथर्वनं केलंय.

हेही वाचा :

  1. काय सांगता! कोल्हापुरातील बाप लेकांनी बनवला अनोखा 'नॅपकिन बुके'
  2. 35 प्रकारच्या शेवंतीनं बहरलं घरचं अंगण; रोज चार तास बागकाम करून सेवानिवृत्त डॉक्टर जपतात 'छंद फुलांचा'

Last Updated : Jan 14, 2024, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.