राजूरा (चंद्रपूर) - मुख्यमंत्री, वनमंत्री महोदाय " सांगा आम्ही मरावं किती " असा संतप्त सवाल बळीराजाने केला आहे. आरटी वन वाघाचा हल्ल्यात दहा शेतकरी, शेतमजूर ठार झाले आहेत. तर पशुधनाचेही मोठे नुकसान वाघाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सयमाचा बांध फुटला आहे. आरटी वन वाघाला ठार करा, अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचे विरूर वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सूरू आहे.
मुख्यमंत्री महोदय सांगा 'आम्ही मरावं किती' बळीराजाचा संतप्त सवाल - राजुरा शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे वाघ ठार करण्याची मागणी
आरटी वन वाघाला ठार करा, ही मागणी लावून धरत शेतकरी संघटनेचा नेतृत्वाखाली विरूर वनपरीक्षेत्र कार्यालयापुढे शेतकरी, शेतमजुरांचे धरणे आंदोलन सूरू आहे. धरणे आंदोलनात राजूरा तालुक्यातील २८ गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूरांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात शेतकरी नेते अॕड.वामनराव चटप, प्रभाकर ढवस, कपील इदे, डाॕ. गंगाधर बोडे, सूरेश आस्वले, आबाजी ढवस, जिवन आमने उपस्थित होते.
मुख्यमंत्री महोदय सांगा 'आम्ही मरावं किती' बळीराजाचा संतप्त सवाल
राजूरा (चंद्रपूर) - मुख्यमंत्री, वनमंत्री महोदाय " सांगा आम्ही मरावं किती " असा संतप्त सवाल बळीराजाने केला आहे. आरटी वन वाघाचा हल्ल्यात दहा शेतकरी, शेतमजूर ठार झाले आहेत. तर पशुधनाचेही मोठे नुकसान वाघाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सयमाचा बांध फुटला आहे. आरटी वन वाघाला ठार करा, अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचे विरूर वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सूरू आहे.
Last Updated : Oct 19, 2020, 5:28 PM IST