ETV Bharat / state

Raj Thackeray : आंदोलन करणाऱ्या कलकाम गुंतवणूकदारांच्या आशा पल्लिवत, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हे दिले आदेश - Interaction with women investors

चंद्रपूरहून निघताना राज ठाकरे ( Raj Thackeray In Chandrapur ) यांनी या पीडित गुंतवणूकदारांचे म्हणणे थोडक्यात समजून या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांना दिले. यानंतर या गुंतवणूकदार महिलांशी संवाद ( Interaction with women investors ) करताना अविनाश जाधव ( Avinash Jadhav ) म्हणाले की "आता साहेबांनी मला सांगितले तर ते काम माझ्या बापाला देखील करावे लागेल" या शब्दात राज ठाकरेंचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला दरारा आणि आदर त्यांच्या या कृतीतून दिसून आला.

Avinash Jadhavs
अविनाश जाधव
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:45 PM IST

चंद्रपूर - कलकाम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पीडित लोकांनी राज ठाकरे ( Raj Thackeray In Chandrapur ) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत जोवर राज ठाकरे भेटणार नाहीत तोवर आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका मांडत ठिय्या आंदोलन केले. अखेर चंद्रपूरहून निघताना राज ठाकरे यांनी या पीडित गुंतवणूकदारांचे म्हणणे थोडक्यात समजून या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव ( Avinash Jadhav ) यांना दिले. यानंतर या गुंतवणूकदार महिलांशी संवाद ( Interaction with women investors ) करताना अविनाश जाधव म्हणाले की "आता साहेबांनी मला सांगितले तर ते काम माझ्या बापाला देखील करावे लागेल" या शब्दात राज ठाकरेंचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला दरारा आणि आदर त्यांच्या या कृतीतून दिसून आला. यानंतर कलकाम कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या हजारो लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

साहेबांनी सांगितले आता तर माझ्या बापालाही काम करावे लागेल;अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया

गुंतवणूकदार पोहोचले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हॉटेल समोर - कलकाम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली. मोठी रक्कम परत मिळेल या आमिषाला बळी जाऊन अनेकांनी लाखोंची गुंतवणूक यात केली. चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांचा विचार करता ही रक्कम 100 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी आपण आपले पैसे परत करून देतो असे अमिश दाखवले मात्र यानंतर त्यांनी कंपनीच्याच अधिकाऱ्यांची बाजू घेत गुंतवणूकदारांची फसवणूक आणि पिळवणूक केल्याचे आरोप करण्यात आले. हे प्रकरण मुंबईपर्यंत जाऊनही याचा कुठलाही तोडगा निघाला नाही. अखेर ही आपबीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या पीडित गुंतवणूकदारांनी केला.

हॉटेल समोरच ठिय्या - राज ठाकरे हे एनडी हॉटेलमध्ये आले असताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न या पीडित गुंतवणूकदारांनी केला. मात्र त्यात त्यांना यश न मिळाल्याने अखेर त्यांनी हॉटेल समोरच ठिय्या मांडून जोवर ( Women Protesting Outside A Hotel In Chandrapur ) राज ठाकरे भेटणार नाहीत तोवर आपण इथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. काही काळासाठी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र राज ठाकरे हॉटेलमधून बाहेर निघताना त्यांनी आवर्जून या पीडितांचे म्हणणे काय याकडे लक्ष दिले आणि त्यातील एका प्रतिनिधीला बोलवून त्यांची मागणी आणि अपेक्षा काय आहे याबाबत विचारले.

साहेबांनी सांगितले तर ते काम आता माझ्या बापाला देखील आता करावे लागेल - यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांना बोलावून या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे तातडीने परत करण्यासाठीचे निर्देश जाधव यांना दिले. मग काय ठाकरे यांचा आदेश सर्वतोपरी. जाधव यांनी लगेच या महिलांचा संपर्क क्रमांक घेत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तातडीने लावण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान बोलताना राज ठाकरेंना बाबतचा धाक आणि आदर देखील त्यांच्या मुखातून समोर आला. "साहेबांनी सांगितले तर ते काम आता माझ्या बापाला देखील आता करावे लागेल, त्यामुळे आता तुम्ही चिंता करू नका पंधरा दिवसांच्या आत मी आपल्याला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल" असे आश्वासन त्यांनी उपस्थित पीडित गुंतवणूकदारांना दिले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. आता यानंतर या पिढीत गुंतवणूकदारांचे पैसे खरंच परत होतात की पुन्हा त्यांना एका नवा नव्या संघर्षाची तयारी करावी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.