ETV Bharat / state

Professor Chetan Solanki : पर्यावरण संवर्धनासाठी प्राध्यापक करणार 11 वर्षे देशभर जनजागृती - Public Awareness

पर्यावरण संवर्धनासाठी ( Save the Environment ) एका ध्येयवेड्या आयआयटीच्या प्राध्यापकाने संकल्प घेतला आहे. यासाठी ते भारत भ्रमंतीवर निघाले असून तब्बल 11 वर्षे अविरत ते प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला असून 2030 पर्यंत ते आपल्या घरी जाणार नाहीत. एका मोठ्या बसमध्येच त्यांनी आपले घर तयार केले आहे. प्रा. चेतन सोलंकी ( Professor Chetan Solanki ), असे या आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रवासादरम्यान ते चंद्रपुरात आले असता त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बातचीत केली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 15, 2022, 8:48 PM IST

चंद्रपूर - पर्यावरण संवर्धनासाठी ( Save the Environment ) एका ध्येयवेड्या आयआयटीच्या प्राध्यापकाने संकल्प घेतला आहे. यासाठी ते भारत भ्रमंतीवर निघाले असून तब्बल 11 वर्षे अविरत ते प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला असून 2030 पर्यंत ते आपल्या घरी जाणार नाहीत. एका मोठ्या बसमध्येच त्यांनी आपले घर तयार केले आहे. प्रा. चेतन सोलंकी ( Professor Chetan Solanki ), असे या आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रवासादरम्यान ते चंद्रपुरात आले असता त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बातचीत केली.

पर्यावरण संवर्धनासाठी प्राध्यापक करणार 11 वर्षे देशभर जनजागृती

असा घेतला कुटुंबाला सोडण्याचा निर्णय - पर्यावरणाची समस्या आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ ( Worlds Temperature is Increase ) झाली आहे. कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण टोकावर गेले आहे. प्रयत्न करण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्या गरजा मर्यादित ठेऊन शाश्वत विकासाची कास धरणे आवश्यक आहे. सौरऊर्जा हा यातील सर्वात महत्वाचा विकल्प आहे. ही गोष्ट प्रा. चेतन सोलंकी यांच्या लक्षात आली असून हा संदेश देशातील सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आपले घर त्यागून यासाठी भारतभर जनजागृती करण्यासाठी ते निघाले आहेत. मात्र, यासाठी सुरुवातीला त्यांच्या पत्नीचा विरोध होता, आईवडिलांनाही संकोच होता. मात्र, त्यांनी आपली भूमिका आणि त्याचे महत्व पटवून दिले आणि सर्वांनी जड अंतकरणातून याला संमती दिली. 2030 पर्यंत ते आपल्या घरी पाय ठेवणार नाहीत.

असा सुरू झाला प्रवास - प्रा. सोलंकी हे आयआयटी मुंबईचे ( Indian Institute of Technology Bombay ) प्राध्यापक असून ते मूळचे मध्यप्रदेशच्या भोपाळचे रहिवासी आहेत. 26 नोव्हेंबर, 2020 म्हणजे संविधान दिनाच्या दिवशी त्यांनी आपल्या यात्रेची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमामुळे प्रभावित होऊन किरण जायभय, प्रशांत मिश्रा, प्रकाश इसवे, चालक गजानन चव्हाण हे त्यांच्यासोबत जुळले, जे नेहमी त्यांच्या सोबत प्रवास करतात. या माध्यमातून त्यांनी मध्यप्रदेश ( Madhya Pradesh ), गुजरात ( Gujrat ), महाराष्ट्र ( Maharashtra ) भ्रमंती केली. ठिकठिकाणी जाऊन सोलंकी या संदर्भात लोकांना भेटतात. त्यांना हे पर्यावरण नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर कसे उभे आहे यावर आपली अभ्यासपूर्ण मांडणी करतात. 2030 पर्यंत आठ ते दहावेळा ते भारत भ्रमंती करणार ( Traveling around India ) आहेत. स्वराज फाउंडेशनच्या ( Swaraj Foundation ) माध्यमातून हे काम ते करत आहेत.

अशी आहे त्यांची बस - ज्या बसमध्ये प्रा. सोलंकी फिरत आहे, ती केवळ बस नसून चालते फिरते घर आहे. यात किचन, बेडरूम, बाथरूम अशी सर्व व्यवस्था आहे. त्यात एसी, टीव्ही, पंखा, शॉवर, चार्जिंग अशा सर्व सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी सौर ऊर्जेवर ( Solar Energy ) चालतात. यासाठी बसवर त्यांनी सोलर पॅनेल ( Solar Panel ) लावून घेतले आहे. प्रत्येक ठिकाणी बस जाऊ शकत नाही. त्यामुळे बसमध्ये त्यांनी एक सायकलही आहे जी इलेक्ट्रिक ( Electric Cycle ) आहे.

जागतिक पातळीचे मिळाले पुरस्कार - 2020 पूर्वी प्रा. सोलंकी 'सोल' परियोजना अंतर्गत सौर ऊर्जा या विषयावर काम करत होते. सौर ऊर्जेचा वापर करून कंदील बनविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. तब्बल 75 लाख कुटुंबांना त्यांनी याचा लाभ करून दिला. याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. IEEE ( Institute of Electrical and Electronic Engineers ) या अमेरिकेतील संस्थेने या कार्याची दखल घेत त्यांना 2019 या पुरस्कार प्रदान केला. तब्बल एक लाख डॉलर पुरस्कार रक्कम त्यांना मिळाली. पुरस्काराच्या याच रकमेतून त्यांनी स्वराज फाउंडेशनचे ( Swaraj Foundation ) काम सुरू केले. एव्हढेच नव्हे तर भारत सरकारचा नवाचार पुरस्कार, तीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ( Guinness Book of World Records ), दोन वैज्ञानिक पुरस्कार ( Scientific Awards ), सीएसआयआर डिझाइन चॅलेंज पुरस्कार ( CSIR Design Challenge Award ), अशी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी सात पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या नावावर चार अमेरिकन पेटंट ( American Patent ) आहेत.

जनजागृतीसाठी जगभ्रमंती - ऊर्जेचा उपयोग, ऊर्जा स्थिरता, जलवायू परिवर्तन शमन ह्या सर्व गोष्टी जगासमोर ठेवण्यासाठी 2019 पूर्वी प्रा. सोलंकी यांनी 30 देशांची यात्रा केली. ऊर्जा स्वराज यात्रेच्या माध्यमातून त्यांनी 15 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. देशातील 28 राज्यात जवळपास 2 लाख किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

असे असते प्रवासाचे नियोजन - पुढील एक महिन्याच्या प्रवासाचे नियोजन हे आधीच केले जाते. कुठल्या ठिकाणी, कुणाकडे जायचे, किती दिवस राहायचे याचे नियोजन आधीच केले जाते. या प्रवासाचा खर्च हा स्वराज फाउंडेशनच्या ( Swaraj Foundation ) माध्यमातून केला जातो. तसेच या अभियानाशी जुळलेल्या लोकांकडून जो निधी मिळतो त्यातूनही हा प्रपंच चालतो. कुठल्याही सरकारकडून मदत निधी घेतला जात नाही, अशी माहिती प्रा. सोलंकी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

हेही वाचा - Chandrapur : हत्तींचे अस्तित्व राज्यासाठी भूषणावह, त्यांचे स्थानांतर होऊ नये; वन्यजीवप्रेमी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.