ETV Bharat / state

चंद्रपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट, माजी आमदार जाणार कोर्टात

author img

By

Published : May 21, 2020, 6:02 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतो. राजुरा आणि कोरपना तालुक्यांत शासनाने केवळ ४ केंद्रांवर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

chandrapur
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट

चंद्रपूर - लाकडाऊनमुळे कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतरही खरीप हंगामाच्या तोंडावर व्यापार्‍यांनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. जिनिंग मालक व व्यापारी सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र, त्याच जिनिंगवर व्यापारी अतिशय अल्पदरात कापूस खरेदी करत आहे. संकटकाळात शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहीत याचिका दाखल करण्यात येईल, या आशयाचे निवेदन माजी आमदार सुदर्शन निमकर व कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सुदर्शन निमकर, माजी आमदार

जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतो. राजुरा आणि कोरपना तालुक्यात शासनाने केवळ ४ केंद्रांवर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. केंद्र सरकारच्या सीसीआय खरेदी केंद्रामार्फत कापूस खरेदी करण्यासाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८ हजार तर कोरपना बाजार समितीकडे ७ हजार ५०० च्या वर कापूस गाड्यांची शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच जिनिंगवर सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

शेतकऱ्यांच्या व सामाजिक संघटनांच्या मागणीनंतर कापसाला योग्य भाव मिळावा, यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जिनिंग मालकांची मागील आठवड्यात सभा घेऊन स्पष्ट निर्देश दिले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सीसीआयमार्फत खरेदी करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही जिनिंग मालक व व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. लॉकडाऊनमुळे पन्नास टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आहे. मात्र याचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत, असे अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी म्हटले आहे.

सीसीआयमार्फत कापसाची अत्यल्प खरेदी
राजुरा येथील केंद्रावर 7 हजार 800 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सीसीआयने फक्त २५२ गाड्यांचा कापूस खरेदी केला. कोरपना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एकूण ७ हजार ६३८ शेतकऱ्यांनी नोंदी केल्या. त्यात फक्त ५४५ गाड्या कापूस सिसिआयने विकत घेतला. चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एकूण ३ हजार ९६७ शेतकऱ्यांनी नोंदी केल्या. येथे फक्त १७० गाडया कापूस सीसीआयने विकत घेतला. भद्रावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने २ हजार ८५७पैकी फक्त ४२० गाड्या कापूस सीसीआयने विकत घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.