चंद्रपूर - अवैधरीत्या दारुसाठा बाळगणाऱ्या भुषण खोत याला गोंडपिपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून 1लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोंडपिपरी शहरात चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात दारूसाठा येणार असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. चारचाकी वाहनाची चौकशी केली असता, वाहनाचा आत 30 हजारांचा दारूसाठा सापडला. याप्रकरणी भूषण रामचंद्र खोत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल गोंडपिपरी पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कोमल्ला यांनी केली.