ETV Bharat / state

Flood In Chandrapur: चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले - Chandrapur Municipal Corporation

मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे ( Chandrapur Erai Dam ) 1.25 मीटरने उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराची झळ ( Flood Stuation Near Rivers ) पोहोचली आहे. 14 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजता गडचांदूर पोलिसांनी 2 दिवसांपासून पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले ( Police rescued 22 drivers ).

Police rescued
पोलिसांचे मदतकार्य
author img

By

Published : Jul 14, 2022, 11:28 AM IST

Updated : Jul 14, 2022, 11:38 AM IST

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार ( Chandrapur Flood ) माजला असताना चंद्रपूर पोलीस नागरिकांना वाचविण्यासाठी देवदूतासारखे धावून येत आहेत. यापूर्वी विरुर पोलिसांनी पुरात अडकलेल्या 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले होते. तर 14 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजता गडचांदूर पोलिसांनी 2 दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले ( Police rescued 22 drivers ) .

पोलिसांचे मदतकार्य

इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडले - चंद्रपूर पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, अनेक अडचणींचा सामना करीत पोलीस बचावकार्य पार पाडत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले ( Chandrapur Erai Dam ) आहेत. आता गोसेखुर्द धरणाचे सुद्धा काही दरवाजे उघडले असून चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे.

वर्धा नदीच्या प्रवाहात सतत वाढ - धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ 2 दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाही. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्याला अडथळा निर्माण होत होता.
अखेर मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्याचा निर्धार करीत मुसळधार पावसात बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरले व एकापाटोपाट सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले.

16 परप्रांतीय वाहनचालकांचा समावेश - वाहनचालकांत 6 स्थानीक तर 16 परप्रांतीय वाहनचालकांचा समावेश आहे. पोलिसांची जीव वाचवल्यामुळे सर्व वाहन चालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 'माल अनलोड केल्यावर आम्ही 2 दिवस कुठेही मुक्काम करतो मात्र सध्या पावसात आम्हाला याबाबत काही अंदाज आला नाही, पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो', अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत पोलिसांचे आभार मानले.

शेकडो घरांत पाणी घुसले - मागील सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. इरई धरणाचे सातही ( Chandrapur Erai Dam ) दरवाजे 1.25 मीटरने उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराची झळ पोहोचली आहे. चंद्रपूर शहरातील रहेमतनगर, राजनगर, सिस्टर कॅालनी येथील शेकडो घरांत पाणी घुसले. शंभराहून अधिक कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने राजुरा-हैद्राबाद मार्ग बंद झाला आहे. पोडसा पुलावरुन पाणी असल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगना मार्ग बंद झाला आहे. प्रशासनाने बचाव पथक तयार केली असून पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नद्या दुथडी भरून वाहत आहेत - जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई, झरपट या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत ( Flood Stuation Near Rivers ). चंद्रपूर शहरातील शंभर कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविले. मनपातर्फे येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. हनुमान खिडकी, पठाणपुरागेट परिसरात पाणी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे ( Chandrapur Municipal Corporation ) पठाणपुरा व रहमतनगर येथील दोन्ही सिव्हारेज ट्रीटमेंट प्लांट पुराच्या पाण्याखाली ( Flood Stuation In Rahmatnagar ) आले आहेत. पूरग्रस्त भागाची खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar ) यांनी पाहणी ( inspect flood affected area )करून लोकांशी संवाद साधला, तथा प्रशासनाला तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने राजुरावरून चंद्रपूरकडे जाणारा राज्य मार्ग बंद झाला आहे. राजुरा शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली. त्यामुळे पुढील दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा -Ashvini Bhide MD Of Metro: अश्विनी भिडेंची वर्णी मेट्रोत, परदेशी सांभाळणार उपमुख्यमंत्री विभाग

Last Updated : Jul 14, 2022, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.