ETV Bharat / state

Suspicious Death a Girl In Chandrapur : चंद्रपुरमध्ये मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी चार जणांना घेतले ताब्यात - चंद्रपुरमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली

चंद्रपुर शहरात एका खुल्या लेआऊटवर एका 20 वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. (Suspicious Death a Girl In Chandrapur) त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार तिचा मृत्यू हा एका वाहनाच्या अपघाताने झाला. दरम्यान, आज पडोली पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पडोली पोलीस स्टेशन
पडोली पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 18, 2022, 9:41 AM IST

चंद्रपूर - शहरात 16 मार्चला एका खुल्या लेआऊटवर एका 20 वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. (Suspicious Death a Girl In Chandrapur) त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार तिचा मृत्यू हा एका वाहनाच्या अपघाताने झाला. मात्र, त्या घटनास्थळी अनेक संशयास्पद आणि आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या होत्या. तसेच, मृत युवतीच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार यात काहीतरी षडयंत्र असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. त्यानुसार आज पडोली पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

क्षितीज Lay-out येथे घेऊन गेला

चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील 20 वर्षीय तरुणी ही आपल्या प्रियकरासोबत पठाणपुरासमोर येणाऱ्या परिसरात गेली होती. त्यांचे ब्रेकअप झाले असल्याने ही त्यांची शेवटची भेट होणार होती. प्रियकर अभिषेक भटारकर याच्या म्हणण्यानुसार ती त्याच्यासोबत गेली होती. अभिषेक तिला शहराबाहेरील असलेले क्षितीज Lay-out येथे घेऊन गेला, त्याठिकाणी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात होती. दुपारी 4 नंतर अभिषेकने युवतीच्या मैत्रिणीला कॉल करत त्यास युवतीचा चारचाकी वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला असल्याची माहिती दिली.

घटनास्थळी आक्षेपार्ह वस्तू आढळल्या

मृत मुलीच्या मैत्रीण व मित्रांनी तत्काळ घटनास्थळ गाठले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन येणे शक्य नसल्याचे म्हटले.
अभिषेकने त्या युवतीसोबत बरे वाईट केल्याचा संशय मृतक मुलीच्या मित्रांनी व्यक्त करीत सरळ शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, घटनास्थळ पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तत्काळ पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला याबाबत माहिती दिली. पडोली पोलिसांनी घटनेची माहिती घेत तपास सुरू केला. मृतक मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव झाला होता, तसेच तिचा पाय देखील मोडला होता. घटनास्थळी चादर, ब्लॅंकेट, निरोधचे पॉकेट अश्या आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने अभिषेक घटनेचा बनाव तर करीत नाही ना अशी दाट शंका निर्माण झाली.

वाहनाचा चालक स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला

मृत मुलीच्या नातेवाईकांनी देखील मुलीसोबत काहीतरी गंभीर घडले असा आरोप केला. तिचा मृतदेह आज सकाळी शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणला असता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील या प्रकरणाची त्वरित आणि सखोल चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले. या प्रकरणात पडोली पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. वाहनाचा चालक स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. या प्रकरणी नेमके काय झाले हे पोलिसांच्या पुढील तपासात उघड होणार आहे.

हेही वाचा - Happy Holi 2022 : रंगात नाहून निघाव फक्त रंगाचा बेरंग नको; ऐका ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.