चंद्रपूर - प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अनेकदा त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून पालन होत नाही. केवळ सर्वसामान्य नागरिकांना याचा भुर्दंड भरावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकदेखील अशा कारवाईंना जुमानत नाही. ही मानसिकता दूर व्हावी, यासाठी वाहतूक विभागाने हेल्मेट सक्तीची ( Helmet compulsory implementation in Chandrapur ) अंमलबजावणी पोलीस विभागापासून सुरू केली आहे.
जिल्ह्यात 17 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात ( Helmet compulsory from 17th Jan in Chandrapur ) आली आहे. या नियमाचे पालन न केल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईची सुरुवात वाहतूक विभागाने पोलीस विभागापासून केली आहे. आतापर्यंत 17 पोलिसांवर व 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळं नागरिकही अवाक् झाले आहेत.
हेही वाचा-Nagpur Crime : नागपुरात पती, पत्नीसह दोन लहान मुलांचे आढळले मृतदेह; हत्या की आत्महत्या?
अपघातात मृत्यूचे वाढले प्रमाण
जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत ( deaths increasing in Accidents in Chandrapur ) आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनातून वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी ( RTO inspector Pravinkumar Patil Chandrapur ) हेल्मेटसक्ती केली आहे. हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणार आहे. प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, त्यानंतर सर्वसाधारण नागरिकांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे.
पुढील काही दिवस फक्त पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई-
गेल्या चोवीस तासात 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दुसऱ्यांदा हे पोलीस विनाहेल्मेट आढळून आल्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. पुढील काही दिवस ही कारवाई फक्त पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांवर केली जाणार आहे. पोलीस किंवा इतर विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर आपल्यालाही नियमांचे पालन करून हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याची भावना सामान्य नागरिकांत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. या सकारात्मक पावलांचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.