ETV Bharat / state

Police baton charge on Ganesha devotees गणेश विसर्जनावेळी पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण; एक कर्मचारी निलंबित, चौकशी सुरू - District Superintendent of Police Arvind Salve

चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनादरम्यान (chandrapur ganesh immersion) चंद्रपूरचा राजा गणेश (raja of chandrapur) मंडळाचे कार्यकर्ते, भाविक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज (Police baton charge) केला. चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाने कारवाईची मागणी केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. तर, पुढील चौकशी सुरू आहे.

Police baton charge on Ganesha devotees
चंद्रपूरात गणेशभक्तांवर पोलीसांचा लाठीचार्ज, चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची कारवाईची मागणी
author img

By

Published : Sep 10, 2022, 7:39 PM IST

चंद्रपूर चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनादरम्यान (chandrapur ganesh immersion) चंद्रपूरचा राजा गणेश (raja of chandrapur) मंडळाचे कार्यकर्ते, भाविक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज 9Police baton charge) केला. चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाने कारवाईची मागणी केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. तर, पुढील चौकशी सुरू आहे.

घडलेला प्रकार असा की काल चंद्रपुरात गणेश विसर्जनास सुरुवात झाली. चंद्रपूर शहरातील गणेशमंडळानी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली. अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. आज सकाळी 2 वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील मानाचा गणपती समजला जाणारा चंद्रपूरचा राजा या गणेशमंडळाची मिरवणूक जयंत टॉकीजजवळ होती. ही मिरवणूक संथगतीने जात होती. त्यामुळे पोलिसांनी मागच्या गणेश मंडळांना पुढे जाण्यास वाट मोकळी करून दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार उपस्थित होते. यादरम्यान चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील सदस्यांनी पोलिसांना याबाबत विचारणा केली. असता त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्ते, गणेश भक्तांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

चंद्रपूरात गणेशभक्तांवर पोलीसांचा लाठीचार्ज, चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची कारवाईची मागणी

त्याठिकाणी वातावरण बिघडले. मात्र, गणेश भक्तांनी संयम बाळगत पुढची वाट धरली व जटपुरा गेट जवळ पोहचताच चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले (dipak bele) व सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत त्या पोलिसांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका गणेश भक्तांनी घेतली. वातावरण चिघळण्याआधी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे (District Superintendent of Police Arvind Salve) तात्काळ आंदोलन ठिकाणी दाखल झाले व सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याची अपील करीत सर्वांची जाहीर माफी मागितली.

एकजण निलंबित पुढील तपास सूरु अधिक चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवर यांच्या सुरक्षारक्षक आदेश रामटेके याला निलंबित केले, व घडलेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे जबाबदारी सोपवली. जयंत टॉकीज चौकात नेमकं काय प्रकार घडला हे तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्यावर कळेलच.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.