ETV Bharat / state

तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर शहरात दुचाकीवरुन तलवार हातात घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी, तलवार, दोन मोबाईल व 11 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

crime
crime
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:52 PM IST

चंद्रपूर - शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.3 ऑगस्ट) संजय नगर एमईएल कंपनीच्या रस्त्यावर करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, पोलीस गस्त घालत असताना त्यांना संजय नगर एमईएल कंपनी रोड चंद्रपूर परीसरात येथे एक व्यक्ती हातात तलवार घेऊन फिरत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार संजय नगर स्नेह मंच समोर येथे गस्तीदरम्यान आरोपी बरकत सिंग दारासिंग डांगी (वय 30 वर्षे रा. इंदिरानगर) आणि मुन्ना रामू जाधव (वय 19 वर्षे, रा. संजय नगर) हे आपल्या दुचाकी (क्र. एम एच 34 ए डी 2178) वरून हातात तलवार घेऊन फिरताना दिसले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक तलवार, दुचाकी, दोन मोबाईल आणि 11 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदास माहुलीकर, संतोष दरेकर, गजानन डोईफोडे, शंकर येरमे, रामभाऊ राठोड, माजीद खा पठाण, निलेश मुडे यांनी केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. कारण, संचारबंदीच्या काळात हे आरोपी हातात तलवार घेऊन खुलेआम फिरत होते. कुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता की लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हा प्रकार करण्यात येत होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या आरोपींना लगेच अटक केल्याने पूढील अनर्थ टळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.