चंद्रपूर- शहरातील भिवापूर वार्डातील प्रिन्स इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोदामातून सात टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली होती. दुकानातील नोकरानेचे ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चोराला 24 तासांच्या आत शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा- 'कोरोनाने भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी'
प्रिन्स इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोदामातून सात टिव्ही चोरील्या गेल्या होत्या. ज्याची किंमत सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. या प्रकरणी दुकान मालक राजीव रविशंकर व्यास यांनी काल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या दुकानातील कामगार रमेश गोवर्धन उईके (वय 39 वर्ष, रा एसपी कॉलेज जवळ गंज वार्ड) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, ठाणेदार बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. अधिकारी बाबा, महिंद्रा बेसरकर, दास चलेकार, विलास नीकोडे, किशोर तुमराम, सिद्धार्थ रंगारी, पांडुरग सानप, सचिन बुटले यांनी केली.