ETV Bharat / state

'लोकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला नाकारले' - ll India Humanity Party News Chimur

चिमूर विधानसभा मतदार संघात गाव तेथे बिअरबार, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डावर दारू, कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे अधिकार, इत्यादी आश्वासन मी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, नागरीकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला मतदारांनी नाकारल्याची प्रतिक्रिया मतदार संघातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे.

महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत
author img

By

Published : Oct 28, 2019, 7:34 PM IST

चंद्रपूर- चिमूर विधानसभा मतदारसंघात गाव तेथे बिअरबार, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डावर दारू, कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे अधिकार, इत्यादी आश्वासन मी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, नागरीकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला मतदारांनी नाकारल्याची प्रतिक्रिया मतदार संघातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया देताना वनिता राऊत

जिल्ह्यात १ मे २०१५ ला दारूबंदी घोषित करण्यात आली. दारूबंदीने फक्त कायदेशीर दारू विक्रीला बंदी झाली. मात्र, अवैध दारू विक्रीला ऊत आले. यामुळे पोलीस प्रशासन आणि अबकारी विभाग घायकुतीला आले आहे. अवैध दारू विक्री प्रत्येक गल्ली बोळात सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दारूबंदी विरोधातील आपल्या आगळ्या वेगळ्या जाहीरनाम्यामुळे चिमूर मतदारसंघातील महिला उमेदवार वनिता राऊत प्रचंड गाजल्या.

गाव तेथे बीअर, सवलतीच्या दरात दारू, अशा घोषणांमुळे त्या राज्य आणि देश पातळीवर प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवाबाबत बोलत असताना वनिता यांनी सांगितले की, मला मतदारांनी २८६ एवढे अल्प मते देऊन नाकारले आहे. मतदारांनी जाहीरनामा समजूनसुद्धा आणि त्यांचे आर्थिक शोषण होत असतानाही त्यांना आपले हित दिसले नाही. त्यामुळे आपण यापुढे चिमूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार नाही.

हेही वाचा- परतीच्या पावसाचा फटका; उभी पिके झाली आडवी, ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे

अखिल भारतीय मानवता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वनिता यांचे पती जितेंद्र राऊत यांनी देखील चिमूर विधानसभा मतदार क्षेत्र व लोकसभा क्षेत्रात पुन्हा स्वतः किंवा पक्षाचा उमेदवार देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या क्षेत्रातील कोणत्याही शहर किंवा गावात शाखा उघडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर या विषयाला विराम मिळाला असला, तरी अवैध दारू विक्रीवर उपाय काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहीला आहे.

हेही वाचा- पहिल्या महायुध्दातील वीर सेनानीचे स्टार पदक खोदकामात सापडले

Intro:बेकायदेकायदेशिर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला नाकारले : वनिता राऊत
सवलतीच्या दरात दारू देण्याचा जाहीरणामा देणाऱ्या उमेदवारास २८६ मते
चिमूर , MHC10019
चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्रात गाव तेथे बियरबार , दारीद्रय रेषेखालील कुटूंबाला सवलतीच्या दरात राशण कार्डावर दारू , कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे अधिकार इत्यादी आश्वासन मि आपल्या जाहीरणाम्यात दिले होते .मात्र नागरीकांना लपुन छपुन बेकायदेशिर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला मतदारांनी नाकारल्याची प्रतिक्रिया चिमूर निर्वाचण क्षेत्रातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केली .
चंद्रपुर जिल्हा दारूबंदी १ मे २०१५ ला घोषीत करण्यात आले मात्र या दारू बंदीने फक्त कायदेशीर दारू विक्री बंद झाली .आणी अवैध दारू विक्रीला ऊत आले .पोलीस प्रशासण आणी अबकारी विभाग घायकुतीला आला आहे . अवैध दारू विक्री प्रत्येक गल्ली बोळात सुरु करण्यात आल्याचे चित्र सर्वत्र आहे . त्यामूळे या अवैध दारु विक्री विरोधात आपल्या आगळ्या वेगळ्या जाहीरणामाण्याने राज्य व देश पातळीवरील प्रसार माध्यमा मध्ये राज्य विधानसभा सार्वत्रीक निवडणुक काळात गाजलेल्या ७४ चिमूर निर्वाचण क्षेत्रातील महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना सांगीतले की , मला मतदारांनी अल्प २८६ मते देऊन नाकारले आहे .
मतदारांनी जाहीरणामा समजुन सुद्धा त्यांनी त्यांचे आर्थीक शोषण होत असतानाही त्यांचे हित त्यांना दिसत नसल्याने यापुढे चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्रात उमेदवारी दाखल करणार नसल्याचे घोषीत केले .अखिल भारतिय मानवता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी चिमूर विधान सभा क्षेत्रा , लोकसभा क्षेत्रात पुन्हा स्वतः किंवा पक्षाचा उमेदवार देणार नसल्याची भुमिका स्पष्ट करीत या क्षेत्रात कोणत्याही शहर किंवा गावात शाखा उघडणार नसल्याची शोभ व्यक्त केला . फसव्या दारू विक्री विरोधात निवडणुकीत जाहीणाम्यातने सर्वत्र उलट सुलट चर्चेस विराम मिळाला असला तरी अवैध दारू विक्रीवर उपाय काय ?हा प्रश्न अनुत्तरीयच राहीला आहे .Body:चिमूर ७४ पराजीत महिला उमेदवार वनिता राऊतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.