ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील ५४ खरेदी केंद्रांमध्ये धान खरेदी सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन - धान खरेदी केंद्रे संख्या चंद्रपूर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन २०२०-२१ या पणन हंगामासाठी जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मान्यता दिली आहे.

Paddy procurement centers Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील ५४ खरेदी केंद्रांमध्ये धान खरेदी सुरू
author img

By

Published : Nov 12, 2020, 2:39 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन २०२०-२१ या पणन हंगामासाठी जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मान्यता दिली आहे.

यात बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत २७ केंद्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. यांच्या मार्फत २७ धान केंद्र, अशी एकूण ५४ धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे.

बिगर आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत. मुल तालुक्यातील मुल व राजोली, सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द), व्याहाड (बु) व पाथरी, सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, रत्नापूर व सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील कोर्धा, नागभीड व तळोधी (बा), ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही, चौगान, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, आवळगाव व अऱ्हेर नवरगाव, चिमूर तालुक्यातील चिमूर व नेरी, गोंडपिंपरी तालुक्यातील गोंडपिंपरी, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथे धान खरेदी केंद्र आहेत.

आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत. नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगाव, जिवनापूर, गोविंदपूर, वाढोणा येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडीमेंढा, लाडबोरी, मुरमाडी, कळमगाव (गन्ना), शिवणी, नाचणभट्टी येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. चिमूर तालुक्यातील डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव (देश), मासळ, टेकेपार, मोटेगाव येथे धान खरेदी केंद्र असणार आहेत. तसेच, वरोरा तालुक्यातील चारगाव (बु), वडधा (बु), भटाळा तर भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे देखील धान खरेदी केंद्र आहेत.

...असा आहे धान खरेदीचा कालावधी

खरीप पणन हंगामासाठी दिनांक १ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत, तर खरीप पणन हंगामसाठी (रब्बी/उन्हाळी) दिनांक १ मे २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत आहे. आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाच्या धानाकरिता प्रति क्विंटल रू. १ हजार ८८८ व साधारण धानाकरिता प्रति क्विंटल रू. १ हजार ८६८ असे शासनाने ठरवून दिलेले असून या किमतीमध्ये बोनसचा समावेश नाही.

केंद्र शासनाने विहीत केलेल्या निर्देशात बसणारे धान खरेदी केल्या जाईल

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या निर्देशात बसणारे धान खरेदी केल्या जाईल. तसेच, धानासाठी आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त १७ टक्के इतके राहील. तेव्हा शेतकऱ्यांनी स्वच्छ व कोरडे असलेले धान खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान खरेदी केंद्रावर स्विकारल्या जाणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांचे गाव ज्या खरेदी केंद्रास जोडलेले आहे, त्याच केंद्रावर धान विक्रीसाठी घेवून जावे. दुसऱ्या खरेदी केंद्रावर धान खरेदी केल्या जाणार नाही. धान विक्रीकरीता शेतकऱ्यांनी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

..ही कागदपत्रे लागणार

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता येताना सोबत आधारकार्ड व चालू असलेले बँकेच्या बचत खात्याचे पासबुक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे, असा चालू वर्षाचा ७/१२ उतारा आणणे अनिवार्य राहील. तसेच, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सीमांत, लघू, मध्यम व मोठे शेतकरी, अशी जमीन धारणेवर आधारीत, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर व अवर्गिकृत अशी वर्गवारी करावयाची असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर त्याबाबत माहिती द्यावी.

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर काही अडचणी आल्यास बिगर आदिवासी क्षेत्राकरिता जिल्हा पणन अधिकारी व्ही.के. गोगिरवार (मो.क्र. ८८२८५०१०९०) व आदिवासी क्षेत्राकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक व्यवस्थापक जी. आर. कोटलावार (मो.क्र. ९४२२९४६३९६) यांच्याशी संपर्क साधावा.

धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापारी, दलाल, मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांने धानाची विक्री केली असल्यास त्यांना चालू वर्षाचा नमुना ७/१२ व बँक खात्यांचा तपशील देणे टाळण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर यांनी केले आहे.

हेही वाचा- ‘आयसीयू’मधील कोरोना रुग्णाशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोला; आरोग्य यंत्रणेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.