ETV Bharat / state

चंद्रपूर : हरियाणातून आलेला व्यक्ती 'कोरोना पॉझिटिव्ह'; एकूण रुग्णांची संख्या 25 - chandrapur corona news updates

२५ मे रोजी हरियाणाच्या गुडगाव येथून विमानाने नागपूरला आणि त्यानंतर मूल येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह आज प्राप्त झाला असून त्याच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचेही देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

हरियाणातून आलेला व्यक्ती 'कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jun 4, 2020, 7:22 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात हरियाणातून आलेला 30 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो २५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून नागपूरला विमानाने आला होता. नागपूरहून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्याला 3 जून रोजी गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. गृह अलगीकरणामध्ये असताना त्याचा स्वॅब घेण्यात आला होता त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आज प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. २५ मे रोजी हरियाणाच्या गुडगाव येथून विमानाने नागपूरला आणि त्यानंतर मूल येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह आज प्राप्त झाला असून त्याच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचेही देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 25 रुग्ण सापडले असून २ मे रोजी एक रुग्ण, १३ मे ला एक रुग्ण, २० मे रोजी १० रुग्ण, २३ मे रोजी ७ रुग्ण व २४ मे रोजी २ रुग्ण, २५ मे ला एक रुग्ण, ३१ मे ला एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर,२ जून रोजी एक रुग्ण व ४ जूनला आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अ‌ॅक्टिव्ह रुग्णाची संख्या आता ३ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.