ETV Bharat / state

चंद्रपुरात आणखी एकाला कोरोनाची लागण; एकूण संख्या २७

author img

By

Published : Jun 5, 2020, 9:35 PM IST

भिवापुर परिसरातील एका ६२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. हा रूग्ण काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रूग्ण म्हणून अतीदक्षता कक्षात दाखल झाला होता. त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

corona Positive
कोरोना पॉझिटिव्ह

चंद्रपूर - शहरातील भिवापुर परिसरातील एका ६२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. हा रूग्ण काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रूग्ण म्हणून अतीदक्षता कक्षात दाखल झाला होता. त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली.

या रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून ताप व खोकला होता. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. काल त्याला चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७ झाली आहे.

चंद्रपूरमध्ये कोरोना रूग्ण सापडण्याचा कालामुक्रम- २ मे (एक बाधीत), १३ मे (एक बाधीत) २० मे (एकूण १० बाधीत) २३ मे (एकूण ७ बाधीत) व २४ मे (एकूण बाधीत २) २५ मे (एक बाधीत) ३१ मे (एक बाधीत) २जून (एक बाधीत) ४ जून (दोन बाधीत) ५ जून (एक बाधीत) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २७ झाली आहेत. आत्तापर्यंत २२ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.