चंद्रपूर- दहावीची परीक्षा देणाऱ्या बहिणीला दुचाकीवरुन घेऊन परत येत असताना झालेल्या अपघातात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर बहीण जखमी झाली. पडोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला. रौनक वीर बहादूर सिंग असे मृत मुलाचे नाव आहे.
हेही वाचा- 'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा
निर्मलनगरी मोरवा येथे राहणारा रौनक बहीण राधिकाला आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, बहिणीला घेऊन परत येत असताना, पडोली पोलीस ठाण्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी (क्रमांक एमएच 34 एव्ही 3120) ट्रकला धडकली. यात रौनकचा जागीच मृत्यू झाला. तर बहीण राधिका किरकोळ जखमी झाली.