चंद्रपूर - शहरातील ऊर्जानगर भागात कारच्या इंजिनमध्ये चक्क नऊ फुटांचा अजगर आढळल्याची घटना पुढे आली आहे. या अजगराला गाडीबाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली. अखेर सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नानंतर त्या अजगराला बाहेर काढण्यात यश मिळाले.
वडगाव येथे राहणारे अनुप माथनकर व अविनाश रोडे हे शेतावरून काल (शुक्रवारी) रात्री घरी परत येत होते. परत येत असताना ऊर्जानगर जवळ एक अजगर त्यांच्या गाडी पुढे आला. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. अजगर निघून जायची त्यांनी वाट पाहिली. मात्र, हा अजगर रस्ता ओलांडून पुढे जाण्याऐवजी होंडा सिटी कारच्या इंजिनमध्ये शिरला. त्यानंतर त्यांना सर्पमित्रांना फोन करून बोलावण्यात आले. मात्र, अनेक प्रयत्न करून देखील अजगर बाहेर निघत नव्हता. शेवटी गाडीला टो करून एका कार वॉशिंग सेंटरमध्ये नेण्यात आले. अखेर मोठ्या प्रयत्यांनंतर या अजगराला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या मदतीने या अजगराला जंगलात सोडले.
हेही वाचा- लव्ह जिहाद : योगींच्या राज्यात बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2020' लागू