चिमूर (चंद्रपूर) - व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करीता देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. यामुळे उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील पळसगांव वनपरिक्षेत्रातील बेलारा गोंडमोहाळी येथे पर्यटकांकरीता प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववर्षाला या पर्यटन गेटचे शुभारंभ करण्यात आले असून यामुळे गाव व परीसरातील युवकांना रोजगार मिळणार आहे.
पर्यटकांची गर्दी होत असल्याने नवे प्रवेशद्वार -
वाघ व जैवविविधतेच्या बघण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला अनेक पर्यटक भेट देतात. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने अनेक पर्यटकांना सफारीकरीता ताटकळत राहावे लागते. यामुळे पर्यटक निराश होतात. ही बाब लक्षात घेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनांने पुन्हा नविन प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे चिमूर तालुक्यातील पळसगांव वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेलारा गोंड मोहाळी बफर प्रवेशद्वार नववर्षाच्या पर्वावर सुरू करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराजवळ गावतलावतील तलावामध्ये बोटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे गाव व परिसरातील युवकांना गाईड, जिप्सी, तिकीट कांऊटर व वॉचमन आदीच्या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
हेही वाचा - इस्रोचे 10 वर्षांत ब्रॉडबँडसाठी पुनर्वापरायोग्य रॉकेट्स, उपग्रह तयार करण्याचे लक्ष्य