ETV Bharat / state

मनोज अधिकारी हत्याकांड; आरोपी तरुणी अजूनही भूमिगत, एलसीबीला छडा लागेना! - Accused Ravindra Bairagi Chandrapur

शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडाला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, गुन्हे शाखेला अद्याप आरोपीचा छडा लागलेला नाही.

Manoj Adhikari murder Chandrapur
मनोज अधिकारी
author img

By

Published : Nov 7, 2020, 6:42 PM IST

Updated : Nov 7, 2020, 7:13 PM IST

चंद्रपूर- शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडाला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या खुनातीस मुख्य आरोपी सीमा दाभर्डेपर्यंत अद्याप पोलीस पोहोचू शकले नाही. खुनाचा छडा त्वरित लागावा म्हणून हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. या तरुणीला अटक करण्यासाठी विशेष पथक देखील नेमण्यात आले. मात्र, तरीही आरोपी अद्याप हाती लागलेली नाही. उलट आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपीचे संबंध अनेक बड्या व्यक्तींसोबत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कायद्यापेक्षा या तरुणीचे 'हात' लांब असल्याचे दिसून येते.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

अनेक बड्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात हातखंडा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेसमोर ही आरोपी तरुणी आव्हान म्हणून उभी ठाकली आहे. त्यामुळे, या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काय आहे मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरण

३० सप्टेंबरला कोसारा येथील सिनर्गी वर्ल्ड येथील एका फ्लॅटमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मनोज अधिकारी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून करण्यात आला होता. यावेळी घटनास्थळावरून आरोपी रवींद्र बैरागी याला रामनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्राथमिक जबाबावरून नगरसेवक अजय सरकार आणि धनंजय देवनाथ यांना अटक करण्यात आली होती. त्यात चौथे नाव समोर आले ते सीमा दाभर्डे हिचे. तिला अटक करण्यासाठी रामनगर पोलिसांचे विशेष पथक नागपुरात गेले. मात्र, त्यांना ती सापडली नाही.

नगरसेवक अजय सरकार आणि मनोज अधिकारी यांचे वैमनस्य

नगरसेवक अजय सरकार आणि मनोज अधिकारी यांचे वैमनस्य होते. त्यांच्यात एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्याच्याही घटना झाल्या होत्या. त्यामुळे, अजय सरकारनेच अधिकारी यांची हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. मात्र, चौकशीत पोलिसांना काही विशेष हाती लागले नाही. रवींद्र बैरागी याने आधीच्या एका जबाबात, हत्येच्या कटात सीमा दाभर्डे आणि सरकारचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. मात्र, पुढे चौकाशीत त्याने वारंवार आपले जबाब बदलले. यादरम्यान आरोपींच्या पोलीस कोठडीत दोनदा वाढ करण्यात आली. मात्र, तपास पुढे सरकू शकला नाही.

मनोज अधिकारी हा सीमा दाभर्डे हिच्यासोबत राहात होता

हत्येच्या काही दिवसापूर्वीपासून मनोज अधिकारी हा सीमा दाभर्डे हिच्यासोबत राहात होता. हत्येच्या दिवशी देखील ती त्याच फ्लॅटमध्ये होती, अशी माहिती आहे. त्यामुळे, या खुनाच्या कटात तिचा देखील सहभाग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच पोलिसांनी तिला आरोपी केले आहे. हत्येच्या दिवशी फ्लॅटमध्ये ३५ प्रकारच्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. त्यातील काही गोष्टी आक्षेपार्ह अशा आहेत. तिथे गुंगी येणाऱ्या गोळ्या तसेच दूध देखील होते. त्यामुळे मनोज अधिकारी यांच्या जवळची सीमा दाभर्डेवरील संशय अधिक गडद होतो.

स्थानिक गुन्हे शाखेला तपास देऊन काय मिळाले?

खुनाचा छडा लवकरात लवकर लागावा म्हणून रामनगर पोलिसांकडून हा तपास स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आला. सीमा दाभर्डे हिला पकडण्याचे मुख्य आव्हान या शाखेसमोर होते. मात्र, महिना लोटून गेला तरी सीमा दाभर्डेला अटक होऊ शकली नाही. तिने भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तिचे अनेक मोठ्या व्यक्तींसोबत संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळेच पोलीस तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आहे का, हा देखील प्रश्न आहे.

विशेष म्हणजे, तिने यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील सादर केला होता. मात्र, घटनेची गंभीरता बघून जिल्हा न्यायालयाने तो नामंजूर केला. एक महिना लोटला असून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी अवघे दोन महिने उरले आहेत. या दरम्यान सीमा दाभर्डेला अटक होणे अत्यंत महत्वाचे आहे. आता तर स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल झाले आहेत. पोलीस निरीक्षक म्हणून बाळकृष्ण खाडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता याचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा- चिमूरच्या वहानगाव शेतशिवारात माकडांचा उच्छाद

Last Updated : Nov 7, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.