ETV Bharat / state

Murder of Young Man : आईचा अपमान केला म्हणुन तरुणाचा केला खून; एक वर्षापासून रचत होता कट - mother in Chandrapur

आईचा अपमान ( Murder of Young Man ) केला म्हणुन आरोपीने मृतकाला मारहाण केली होती. मात्र, यानंतरही त्याच्यातला संताप क्षमला नाही. नाशिकमधून चंद्रपुरात येऊन त्याने तरुणाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आणि हत्येचे रहस्य उलगडले. ( Murder of young man for insulting his mother in Chandrapur )

Murder of Young Man
आईचा अपमान केला म्हणुन तरुणाचा केला खून
author img

By

Published : Jun 15, 2022, 8:16 PM IST

चंद्रपूर - आईचा अपमान ( Murder of Young Man ) केला म्हणुन आरोपीने मृतकाला मारहाण केली होती. मात्र, यानंतरही त्याच्यातला संताप क्षमला नाही. नाशिकमधून चंद्रपुरात येऊन त्याने तरुणाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आणि हत्येचे रहस्य उलगडले. ( Murder of young man for insulting his mother in Chandrapur )

अशी घडली घटना - मंगळवारी रात्री चंद्रपुरातील ज्यूबिली शाळेच्या आवारातील शासकीय इमारतीच्या अंदाजे 25 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतक युवकाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर मृतकाची ओळख पटविण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला.

असा लागला छडा - गोपनीय माहिती मिळाल्यावर मृतक हा राजुरा निवासी राहुल विलास ठक असल्याची माहिती मिळाली. राहुल हा डॉ. चिल्लरवार यांच्याकडे वाहनचालक होता. आरोपींनी घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. सखोल तपास केला असता एक वर्षापूर्वी मृतक राहुलने एका महिलेच्या मोबाईवर मॅसेज केल्याने वाद निर्माण झाला होता. या महिलेच्या दोन मुलांनी राहुलला मारहाण केली होती. ही माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची चमू महिलेच्या घरी पोहचली. मुलांबाबत विचारपूस केली असता लहान मुलगा घरी आढळला मात्र मोठा मुलगा नाशिक येथील MIDC मध्ये कुटुंबासहित राहत असल्याची माहिती मिळाली.

दारुच्या नशेत केला खून - आरोपी वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिकला आहे की नाही याबाबत माहिती घेतली. तर तो तीन दिवसांपासून चंद्रपूरला आल्याची माहिती मिळाली. सध्या वैभव कुठे आहे आणि त्याचे मित्र कोण याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला. इंदिरानगर येथील 30 वर्षीय संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बरलेवार याला ताब्यात घेतले. पोलिसांना तो तपासात सहकार्य करीत नव्हता. त्याचवेळी पोलिसांना वैभव हा रात्री मित्रांसोबत नाशिकला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ वैभव डोंगरे व त्याचा साथीदार सिंदेवाही येथील 25 वर्षीय कार्तिक रमेश बावणे यांना ताब्यात घेत विचारपूस केली. आरोपीनी राहुलची हत्या केली असल्याची कबुली दिली. 14 जूनला सायंकाळी 7 ते 8 वाजता राहुलला सोबत घेत ज्यूबली शाळेच्या आवारातील शासकीय पडक्या इमारतीच्या छतावर नेत दारू पाजली. दारूच्या नशेत असलेल्या राहुलचा गळा आवळत त्याच्या डोक्यावर दारूच्या बॉटल फोडल्या. या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाचे हात पाय चिकटपट्टीने चिपकविण्यात आले. आव्हानात्मक खुनाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीनी 24 तासाच्या आत ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला. सदर प्रकरणी आरोपी वैभव राजेश डोंगरे, कार्तिक रमेश बावणे व संदीप राजकुमार बरलेवार यांना कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray Ayodhya Visit : आदित्य ठाकरे अयोद्धा दौरा; 'आमची प्रभू रामावर विशेष श्रद्धा', शरयूची केली सायंआरती

हेही वाचा - Aaditya Thackeray at Ayodhya : अयोद्धेत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी प्रयत्न करणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

हेही वाचा - President Election Meet : राष्ट्रपती निवडणूक उमेदवारीसाठी शिवसेनेचा शरद पवारांना पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.