ETV Bharat / state

हत्येचे गूढ उकलले.. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीचा निर्घूण खून.. असा रचला कट - Sumathana young girl murder mystery solve

एकाच खोलीत राहणाऱ्या मैत्रिणी. चांगल्या मैत्रीत अचानक मिठाचा खडा पडला. काही कारणास्तव त्यांची भांडणे व्हायला लागली. या अपमानाचा बदला घेण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. आणि अखेर 17 वर्षीय मैत्रिणीने आपल्याच मैत्रिणीचा अत्यंत निर्घृणपणे खून केला.

crime
गुन्हे
author img

By

Published : Apr 11, 2022, 8:13 AM IST

चंद्रपूर - एकाच खोलीत राहणाऱ्या मैत्रिणी. चांगल्या मैत्रीत अचानक मिठाचा खडा पडला. काही कारणास्तव त्यांची भांडणे व्हायला लागली. या अपमानाचा बदला घेण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. आणि अखेर 17 वर्षीय मैत्रिणीने आपल्याच मैत्रिणीचा अत्यंत निर्घूणपणे खून केला. ही घटना आहे भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील. जिथे एक शीर नसलेले धड विवस्त्र अवस्थेत सापडले होते. या प्रकरणाचा उलगडा झाला असून याबाबतचा खुलासा चंद्रपूर पोलिसांनी केला.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - ISRO Team In Chandrapur : उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोची टीम चंद्रपुरात

अशी घडली घटना : 4 एप्रिल रोजी भद्रावती तालुक्यातील सुमठाणा - तेलवासा मार्गाच्या लगत असलेल्या शेतशिवारात सकाळच्या सुमारास एका 22 वर्षीय तरुणीचे शिरवेगळे धड विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ही घटना नेमकी कशी झाली, ही तरुणी कोण आहे? याचा उलगडा होत नव्हता. पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचे निर्देश दिले. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

यादरम्यान जिल्ह्यातील सर्व बेपत्ता मुलींची माहिती काढण्यात आली. काहींना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आणण्यात आले. कोणीही तिच्या ओळखीला दुजोरा दिला नाही. त्यामुळे, या खुनाचा तपास तर दूर या तरुणीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. अनेक दिवस लोटले मात्र काहीच सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव गाठले. तरुणीच्या मोठ्या बहिणीला ओळख पटविण्यासाठी आणण्यात आले. तिचे शरीर बघून ही आपलीच लहान बहीण असल्याची स्पष्टोक्ती तिने दिली. त्यानंतर पोलिसांची तपासाची सूत्रे वेगाने हलू लागली. याच तपसांती एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आणि तिने या तरुणीच्या खुनाची कबुली दिली.

असा केला सुनियोजित खून : हा खून इतका सुनियोजितपणे करण्यात आला की पोलीसही चक्रावून गेले. अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र, प्राथमिकदर्शी या खुनाचा उलगडा झाला आहे. त्यानुसार मृतक आणि आरोपी या सख्ख्या मैत्रिणी होत्या. चंद्रपूर येथील एका खोलीत त्या राहत होत्या. मात्र, हळूहळू त्यांच्यात वितुष्ट निर्माण व्हायला लागले. मृतक तरुणी ही आरोपीच्या मित्रांसमोर तिचा वारंवार अपमान करायची. त्यामुळे, तिने अत्यंत निर्घृणपणे काटा काढायचे ठरवले. ही बाब तिने आपल्या अल्पवयीन मित्राला सांगितली. त्यानुसार त्यांचे कटकारस्थान शिजायला लागले.

कुठे मारायचे, कसे मारायचे, त्यानंतर काय करायचे याचे सर्व नियोजन त्यांनी केले. 3 एप्रिल रविवारी या तरुणीला रात्री 8.45 वाजता वरोरा नाका येथे बोलाविण्यात आले. इथे दोन्ही अल्पवयीन आरोपी दुचाकी घेऊन तिची वाट बघत होते. यानंतर या तरुणीला दुचाकीवर बसण्यासाठी सांगितले. रात्री 12 वाजताच्या सुमारास आरोपी सुमठाणा येथील घटनास्थळी पोहचले. आरोपी मुलाने तिला मारहाण करीत खाली पाडले आणि तिच्या मांडीवर दोनदा चाकू भोसकण्यात आला. त्यानंतर आरोपीने तिच्या पोटावर बसून गळा दाबून तिला ठार केले. तिची ओळख पटू नये यासाठी अल्पवयीन आरोपी आणि तिचा मित्र यांनी आळीपाळीने आपापल्या चाकूने तिचा गळा कापून धडावेगळा केला. तसेच, तिच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकले. डोके आणि कपडे घेऊन हे आरोपी पसार झाले. यानंतर दाताळा मार्गावरील रामसेतू या पुलावरून इराई नदीत हे डोके फेकून देण्यात आले. आज पोलिसांना हे डोके आढळून आले. या अल्पवयीन मुलीचा आरोपी मित्र अजून फरार आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. काही पैलूंवरच अद्याप प्रकाश पडू शकला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - Bhadrawati Police : भद्रावतीमधील 'त्या' मृत तरुणीची ओळख पटली; तीन जण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.