चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (दि. 6 जून) एकदिवसीय दौऱ्यासाठी चंद्रपूरला येत आहे. या दरम्यान त्या चंद्रपूरातील विविध कार्याचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11.30 वाजता त्या चंद्रपूरला पोहोचणार आहेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्या छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहेत. यानंतर 12 वाजता त्या जिल्हा नियोजन कार्यालयात बचतगटच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता त्या जनता महाविद्यालयात एक बैठकीला संबोधित करणार आहेत. 4 वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 5.45 वाजता त्या ईको प्रो संस्थेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत.
त्यानंतर बांबू कलावंत मीनाक्षी वाळके यांच्या घरी जाऊन त्या बांबू कलाकृती प्रकल्प याबाबत वाळके यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृहात बैठक घेणार आहेत. यानंतर मंगळवारी (दि. 7 जून) सकाळी आठ वाजता त्या गडचिरोलीकडे जातील.