ETV Bharat / state

'ज्यांच्या घड्याळाचे बारा वाजले त्यांच्याबद्दल काय बोलयचे' - खासदार पूनम महाजन

महिलांच्या आरोग्यासाठी चूलमुक्त अभियान राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान केल्याचे पूनम महाजन म्हणाल्या.

बोलताना खासदार पूनम महाजन
बोलताना खासदार पूनम महाजन
author img

By

Published : Jan 28, 2020, 8:02 AM IST

चंद्रपूर - माझ्या वडीलांनी सांगीतले होते की विकासाची लक्ष्मी घरा-घरात पोहचवायची आहे. टाटा-बाय हाताच्या पंज्यात लक्ष्मी वसत नाही. जंगलात फिरणाऱ्या धनुष्यबाणावर सुद्धा लक्ष्मी वसत नाही आणी ज्यांच्या घडाळ्याचे बारा वाजले आहेत त्यांचे बद्दल काय बोलायचे. लक्ष्मी फक्त कमळाच्या फुलावरच वसते त्यामूळे विकासाची लक्ष्मी कमळच घराघरात पोहचवू शकते, असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी केले.

हेही वाचा - क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप

चिमूर तालुका महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक सभागृह, चिमूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार पूनम महाजन बोलत होत्या.

यावेळी बोलताना खासदार पूनम महाजन म्हणाल्या, प्रमोद महाजन यांनी भाजपचा वटवृक्ष वाढवत असताना याच चिमूर शहरात एका सभेत 5 कार्यकर्त्यांपासून सुरू केलेले भाषण आज त्यांची मुलगी म्हणून 50 हजार कार्यकर्त्यांना संबोधत आहे. भाजपचे विचार वाढविण्याचे काम केल्याने, हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला भगिनी हीच या भाजपची ताकत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी चूल मुक्त करण्याचे धोरण व स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महिला कशा सक्षम राहतील यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करत विविध योजना दिल्या. त्यामुळे महिलांना सन्मान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बंटी भांगडीया म्हणाले, आम्ही राजकारण करत असताना मातृशक्तीचे प्रेम जपले यामुळे या मतदार संघात दोन वेळा भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चिमूरला न्याय मिळाला नाही. पण, 2014 मध्ये केंद्र व राज्यातील भाजप सरकारने चिमूर मतदार संघासाठी भरीव निधी देत चौफेर विकास केला. शिवसेनेने स्वतःची पोळी भाजण्यासाठी विरोधी विचारसरणीसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोपसुद्धा आमदार भांगडीया यांनी केला.

हेही वाचा - राजुरा पोलीस ठाण्यातील शिपायाची विष पिऊन आत्महत्या?

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूरचे आमदार बंटी भांगडीया, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजप महिला आघाडी प्रदेश महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर, वसंत वारजूकर, भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे, सामाजिक कार्यकर्त्या मेघा भांगडीया, अपर्णा भांगडीया, नगरसेवक शिल्पा राचलवार यांसह आदी उपस्थित होते .

हेही वाचा - जिल्ह्यात 'शिवभोजन' योजनेची सुरुवात, चव न चाखताच परतले पालकमंत्री

Intro:ज्यांच्या घळ्याडाचे बारा वाजले त्यांचे बद्दल काय बोलायचे -पूनम महाजन*
चिमूर येथील हळदी कुंकू व महिला मेळावा*
*हजारोंच्या संख्येने महिलांची गर्दी*
चिमूर
माझ्या वडीलांनी सांगीतले होते की विकासाची लक्ष्मी घरा घरात पोहचवायची आहे .टाटा बाय हाताच्या पंज्यात लक्ष्मी वसत नाही ,जंगलात फिरणाऱ्या धनुष्यबाणावर सुद्धा लक्ष्मी वसत नाही आणी ज्यांच्या घळयाडाचे बारा वाजले आहेत त्यांचे बद्दल काय बोलायचे ,लक्ष्मी फक्त कमळाच्या फुलावरच वसते त्यामूळे विकासाची लक्ष्मी कमळच घराघरात पोहचवु शकते ,असे प्रतिपादन युवा मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्षा खासदार पुनम महाजन यांनी केले .
चिमूर तालुका महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा तथा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक सभागृह चिमूर येथे आयोजीत कार्यक्रमा मध्ये उद्धाटक म्हणुन खासदार पुनम महाजन बोलत होत्या .यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया ,जील्हा परीषद उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजप महिला आघाडी प्रदेश महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर ,वसंत वारजूकर ,भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे ,सामाजिक कार्यकर्त्या मेघा भांगडीया ,अपर्णा भांगडीया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिल्पा राचलवार ,नप गट नेत्या छाया कनचलवार ,डॉ देवनाथ गणधारे , दत्तू पिसे, डॉ श्यामजी हटवादे, प्रकाश वाकडे, निलम राचलवार, राजू देवतळे ,मजहर पटेल ,प्रा विजय टिपले ,मनोहर मुंगले, ओमप्रकाश गणोरकर, दिलीप कारेकर, अवि बारोकर, नम्रता राचलवार ,किशोर मुंगले उपस्थित होते .
याप्रसंगी बोलतांना पूनम महाजन म्हणाल्या की , प्रमोद महाजन यांनी भाजपचा वटवृक्ष वाढवित असतांना याच चिमूर शहरात एका सभेत 5 कार्यकर्त्यापासून सुरू केलेला भाषण आज त्यांची मुलगी म्हणून 50 हजार कार्यकर्त्यापर्यत भाजपचे विचार वाढविण्याचे काम केल्याने ,हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला भगिनी ही त्याच भाजपची ताकत आहे .महिलांच्या आरोग्यासाठी चूल मुक्त करण्याचे धोरण व स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .महिला कश्या सक्षम राहतील या करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करीत विविध योजना दिल्या त्यामुळे महिलांना सन्मान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की आम्ही राजकारण करीत असताना मातृशक्तीचे प्रेम हीच भाजपची शक्ती असून मतदार संघातील मातृशक्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप वर प्रेम करीत असताना त्यांनी दोन वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने मातृशक्ती सिद्ध झाले जेव्हा पासून देश स्वंतत्र झाला तेव्हा पासून चिमूर क्रांती भूमीला न्याय दिला नाही सन 2014 पासून केंद्र व राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने न्याय देण्याचे काम करून भरपूर निधी देत चौफेर विकास केला सत्ता कोणाचीही असो हक्क व न्यायासाठी आपल्या सहकार्याने खंबीर राहत असल्याचे गर्जून सांगितले शिवसेने स्वतःची पोळी शिकण्यासाठी विरोधी विचारसरणी सोबत हातमिळवणी केला असल्याचा आरोप सुद्धा केला क्रांती भूमीत दोन वेळा आमदार होण्याचा मान मातृशक्ती मुळे झाला असल्याचे सुद्धा सांगितले बंटी भांगडीया यांनी सांगितले व या मातृशक्ती चे आभार मानले .
यावेळी पूनम महाजन व आमदार बंटी भांगडीया यांचा सहपत्नी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान डॉ श्यामजी हटवादे,गीता लिंगायत,प्रदेश महामंत्री अर्चना डेहनकर, अपर्णा भांगडीया, निलम राचलवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .
दरम्यान खासदार पूनम महाजन यांचे जोरदार स्वागत केले महिलांना होम मिनिस्टर च्या धर्तीवर रोशन अगडे व त्यांच्या संचानी उर्वरित वेळेत रिजविले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया ननावरे यांनी केले संचालन भारती गोडे तर आभार कल्याणी सातपुते यांनी केले भाजप महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या मेळाव्यास हजारो महिलांची उपस्थिती होती .
Body:पुनम महाजनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.