ETV Bharat / state

MP Balu Dhanrokar Funeral : खासदार बाळू धानोरकरांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार; पत्नीने फोडला हंबरडा - मेदांता रुग्णालयातच उपचार

राज्यातील काँग्रेसचे खासदार धानोरकर यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. आज दिल्लीहून त्यांचे पार्थिव नागपुरात आणण्यात आले. यानंतर रुग्णवाहिकेने नागपूरहुन त्यांच्या मुळ गावी वरोरा येथे आणण्यात आले आहे. उद्या सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, यानंतर सकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Balu Dhanrokar Passed Away
बाळू धानोरकरांचे पार्थिव वरोरा पोचले
author img

By

Published : May 30, 2023, 10:44 PM IST

Updated : May 30, 2023, 11:01 PM IST

खासदार बाळू धानोरकरांचे पार्थिव वरोरा पोचले

चंद्रपूर: खासदार धानोरकर म्हणजे आक्रमक आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे स्वास्थ्य बिघडले होते, त्यांना किडनीचा त्रास होता. यातच त्यांच्या स्वास्थ्यात आणखी गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यामुळे नागपूरहुन त्यांना दिल्ली रवाना करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नागपुरात आणण्यात आले. आज वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी ते ठेवण्यात येणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांना शोक अनावर: नागपूर विमानतळावर खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव पोचल्यावर कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना शोक अनावर झाला. त्यांची स्थिती पाहता सुनील केदार यांनी पुढे होत त्यांना आधार दिला. शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांना सांभाळून घेतले. यावेळी संपूर्ण धानोरकर कुटुंब सोबत होते. दीड वाजता धानोरकर यांचे पार्थिव वरोराकडे रवाना झाले. उद्या सकाळी 11 वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यांची असणार उपस्थिती: अंत्यसंस्कारासाठी नाना पटोले, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार सह राज्यातील मोठे नेते अंत्यसंस्कारासाठी वरोरा इथे उपस्थित राहणार असल्याचे, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगितले आहे.

दोन दिवसापूर्वी केले दिल्लीतील रुग्णालयात दाखल : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते.

हेही वाचा -

  1. आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारा खासदार धानोरकर
  2. MP Balu Dhanorkar राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
  3. Balu Dhanorkar Health खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली दिल्लीत उपचार सुरू

Last Updated : May 30, 2023, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.