चंद्रपूर - आज पेट्रोलने शंभरी पार केली, डिझेल शंभराच्या उंबरठ्यावर आहे. इंधनाचे दर वाढले तर दळणवळणाचे दर वाढतात, याचे चटके आज सामान्य नागरिकांना बसत आहेत. बांग्लादेशपेक्षा आपल्या देशाची पत घसरली आहे. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत कुठलेही नियोजन नसणारे हे मोदी सरकार आहे. जर सरकार चालवता येत नसेल तर यांनी चालते व्हावे, असे वक्तव्य राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात आज महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले.
अर्थव्यवस्थेचे कुठलेही नियोजन नसलेले मोदी सरकार - खासदार बाळू धानोरकर - खासदार बाळू धानोरकर
काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर परिणाम झाला नाही. सामान्य माणसांना दिलासा देण्याचीच भूमिका घेतली होती. मात्र, आताचे मोदी सरकार सामान्य जनतेवर उठले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही परिणाम होताना दिसत नाही, असेही धानोरकर म्हणाले.