ETV Bharat / state

चोर असल्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू - चोर समजूर मारहाण

पंकज लांडगे आणि त्याचा मित्र अविनाश आपल्या थकीत उधारीच्या वसुलीसाठी पागल बाबानगर या भागात रात्री साडेदहा वाजता गेले. त्यांनी एका घरी जाऊन उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरातील नागरिकांनी त्यांना चोर समजून पकडले.

संशयातून दोघांना बेदम मारहाण
संशयातून दोघांना बेदम मारहाण
author img

By

Published : Dec 20, 2019, 7:56 PM IST

चंद्रपूर - शहरातील पागल बाबानगर परिसरात चोर समजून नागरिकांनी दोन तरूणांना बेदम मारहाण केली. अविनाश कल्लो आणि पंकज लांडगे अशी या तरूणांची नावे आहेत. यातील पंकज लांडगे (वय-24) या तरूणाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेबाबत पोलीसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संशयातून दोघांना बेदम मारहाण

शहरातील बल्लारपूर बायपास वळण परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवेने मागील काही दिवस नागरिक त्रस्त आहेत. पंकज लांडगे आणि त्याचा मित्र अविनाश आपल्या थकीत उधारीच्या वसुलीसाठी पागल बाबानगर या भागात रात्री साडेदहा वाजता गेले. त्यांनी एका घरी जाऊन उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरातील नागरिकांनी त्यांना चोर समजून पकडले.

हेही वाचा - बाळासाहेब असते तर स्मारकासाठी झाडं तोडणाऱ्यांचे....

त्यानंतर घरातील लोक आणि शेजाऱ्यांनी पकडलेल्या तरूणांना एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊपर्यंत ही मारहाण सुरू होती. या जखमी तरूणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पंकज लांडगे याने रस्त्यातच प्राण सोडले.

याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या लोकांपैकी चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू केला असून यामागचे नेमके कारण शोधले जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

पागलबाबा नगर परिसरात मागील दिवसांपासून चोर फिरत असल्याच्या अफवेने नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी देखील विविध पथकं स्थापन करून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मारहाणीची घटना घडली, असे नांदेडकर यांनी सांगितले.

Intro:चंद्रपूर : देशभरात जमावाच्या हिंसक वृत्तीची चर्चा होत आहे. चंद्रपुरात चोर समजून नागरिकांनी एका निरपराध युवकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या धक्कादायक घटनेतील जमावात असलेल्या 4 आरोपीना ताब्यात घेतले आहे.

शहरातील पागल बाबानगर परिसरात जमावाने केलेल्या मारहाणीत एका निरपराध युवकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बल्लारपूर बायपास वळण परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवेने गेले दहा दिवस नागरिक त्रस्त आहेत. असे असताना चंद्रपूर शहरातील तुकूम भागात वास्तव्याला असलेल्या पंकज लांडगे नामक 24 वर्षीय युवकाने आपल्या थकीत उधारीच्या वसुलीसाठी या भागात रात्री 10.30 वाजता प्रवेश केला. एका घरी जात उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्या घरातील नागरिकांनी चोर समजून या युवकाला पकडून बेदम मारहाण केली. युवकासोबत त्याचा मित्रही होता या दोघांनाही घटनास्थळी असलेल्या एका झाडाला बांधून बेदम मारहाण सुरू केली. हे सुरू असतानाच या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही मारहाण सुरू होती. या दोन्ही युवकांना घेऊन पोलिसांनी रुग्णालयात पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच पंकज लांडगे या युवकाने प्राण सोडले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून यामागचे नेमके कारण शोधले जात आहे.

पोलीस यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह

पागलबाबा नगर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून चोर शिरत असल्याच्या अफवेने नागरिक त्रस्त असताना रात्री जागवल्या जात आहेत. पोलिसांनी देखील विविध पथके स्थापन करून नागरिकांना या पासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही अशा घटना घडली. मात्र तरीही अशी घटना घडलेच कशी यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाईट १) अविनाश कल्लो, घटनेत जखमी युवक

बाईट २) शीलवंत नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूरBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.