ETV Bharat / state

पालकमंत्र्यांचे सप्टेंबर महिन्याचे आश्वासन हवेत विरले; दारूबंदी उठवण्यासाठी 'तारीख पे तारीख' - liquor ban in chandrapur news

कुठल्याही परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील दारूबंदी हटणार अशी ठाम घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जून महिन्यात केली होती. त्यामुळे ही वचनपूर्ती करण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला पण वडेट्टीवार यांच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.

दारूबंदी उठविण्याची तारीख पे तारीख
दारूबंदी उठविण्याची तारीख पे तारीख
author img

By

Published : Oct 8, 2020, 6:01 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्याची दारूबंदी सपशेल अपयशी ठरल्याने सप्टेंबर महिन्यात कुठल्याही परिस्थितीत दारूबंदी हटवू, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाळला तरी जिल्ह्यातील दारूबंदी उठू शकली नाही. त्याची समीक्षा करण्यासाठी आता पुन्हा दोन समित्या नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांची घोषणा आता हवेत विरली आहे, असे म्हणत आता ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविण्यासाठी 'तारीख पे तारीख' सुरुच

1 एप्रिल 2015 ला तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. मात्र, ती आजवर कागदावरच आहे. कारण जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी दारू सहज उपलब्ध होते आहे. शेजारचे जिल्हे आणि राज्यातून यासाठी मोठ्या प्रमाणात दारुतस्करी केली जाते. यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याला काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. दारूतस्करीच्या प्रतिस्पर्धेत टोळीयुद्धदेखील सुरू झाल्याची चर्चा आहे. या व्यतिरिक्त आजवर जिल्ह्यात तब्बल 93 कोटींची दारू जप्त करण्यात आली. मात्र, जितकी दारू जिल्ह्यात येत आहे त्या तुलनेत जप्त केलेली दारू ही नगण्य आहे.

विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दारूबंदीच्या निर्णयावर घणाघाती प्रहार केला. ह्या दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मार्च महीन्यात हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यात दारूबंदी उठविण्याच्या संदर्भात सर्वात जास्त सूचना आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी उठणार या चर्चेला उधाण आले. या चर्चेला वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. कुठल्याही परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील दारूबंदी हटणार अशी ठाम घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जून महिन्यात केली होती. जिल्ह्यातील समितीच्या अहवालाच्या आधारावर थेट राज्याची कॅबिनेट निर्णय घेईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यामुळे ही वचनपूर्ती करण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला पण वडेट्टीवार यांच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. यावर आता वडेट्टीवार हे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.

वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन आणि शाळा सुरू करण्यासंदर्भात देखील वक्तव्य केले होते. मात्र, त्यांचे वक्तव्य हे खरे होऊ शकले नाही. अशातच त्यांचे सप्टेंबर महिन्यात दारूबंदी उठविण्याचे आश्वासन फोल ठरल्याने जनतेकडून त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या दारूबंदीच्या विधानावर त्यांच्यावर उपहास केला जात आहे. यावरुन दारूबंदीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. जी स्वप्ने वडेट्टीवार यांनी दाखवली ती वेळेवर पूर्ण करू न शकल्याने ते टीकेचे धनी झाले आहेत. राजकारणात दिलेल्या शब्दाला फार महत्त्व असते, म्हणून ते जपून वापरावे लागतात. अन्यथा ते अंगलट येऊ शकतात. दारुबंदीच्या विषयावर आता वडेट्टीवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पुढील घडामोडी नेमक्या काय घडतात हे बघणे आता उत्सुक्याचे ठरणार आहे.

दारूबंदीची तारीख पे तारीख सुरुच

जिल्ह्याच्या दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने मार्च महिन्यात आपला अहवाल सादर केला. तर, सप्टेंबर महिन्यात दारूबंदी उठली नाही. मात्र, यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. यावर नुकतीच कॅबिनेटची बैठक पार पडली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या स्तरावर एक समिती जिल्ह्यातील दारुबंदीचा अभ्यास करणार आहे. ही समिती आपला अहवाल देणार आहे. या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाची आणखी एक समिती असणार आहे. शासनाच्या समितीत आमदार, मंत्री, सचिव यांचा समावेश असणार आहे. नंतर त्यावर सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे.

हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ 'अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.