ETV Bharat / state

चंद्रपुरात महिला बचत गटांनी बनविले मास्क, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यासाठी पुढाकार - chandrapur women made mask

नगरपरिषद अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना घरबसल्या युट्युब वरून मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लॉकडाऊन स्थितीतही शहरातील झोपडपट्टी भागातील सोनिया नगर येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत.

चंद्रपुरात महिला बचत गटांनी बनविले मास्क

author img

By

Published : Apr 10, 2020, 10:00 AM IST

Updated : Apr 10, 2020, 3:09 PM IST

चंद्रपूर - देशभरात कोरोनामुळे दहशत पसरलेली आहे. देशात एकवीस दिवसांचा लॉकडाऊन आहे. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी लागलेली आहे. आंतरजिल्हा व आंतरराज्याच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन धडपडत आहे. या काळात मास्कचा अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत नागरिक, प्रशासनातील कर्मचारी, सफाई कामगारांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतलेला आहे.

चंद्रपुरात महिला बचत गटांनी बनविले मास्क

नगरपरिषद अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना घरबसल्या युट्युब वरून मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लॉकडाऊन स्थितीतही शहरातील झोपडपट्टी भागातील सोनिया नगर येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद राजुरा अंतर्गत श्रद्धावस्ती स्तर संस्था, सोनियानगर राजुरा येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्यासाठी अतिशय विपरीत परिस्थितीत काम करीत आहेत. लॉकडाऊन नंतर राजुरा नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली. शहरातील शासकीय कार्यालये, बँक ऑफिस, बस स्टॉप , भाजीपाला मार्केट शेड तसेच शहरातील प्रत्येक वार्डात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने दैनिक भाजीपाला मार्केट स्थलांतरण आठवडी बाजार बंद करण्यात आला.

बाहेरून आलेल्या विद्यार्थी व नागरिकांचे होम क्वारंटाईन करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने सर्व सफाई कामगारांना व इतर कार्यालयातील कर्मचारी यांना मास्क देण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना काम देण्यात आले. सोनिया नगर येथील बचत गटातील महिला गेल्या पाच दिवसांपासून मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे प्रोत्साहन व मुख्याधिकारी जुही अर्शिया यांच्या मार्गदर्शनाखाली युट्युब वरून मास्क बनविण्याचे कौशल्य प्राप्त केले. समन्वय सुरेखा पटेल यांच्या माध्यमातून महिला बचत गट समूहातील व नुकतेच पाचशे मास्क बनवून नगरपरिषदेकडे सुपूर्द केलेत.

अतिशय कठीण परिस्थितीत सोनियानगर येथील महिला पुढाकार घेऊन मास्क तयार करत आहेत. आणखी पाचशे मास्क नगरपरिषदेला देणे आहे. शहरातील सोनिया नगर येथील झोपडपट्टीतील महिला बचत गटातील सदस्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. यात समन्वक सुरेखा पटेल यांचे मोलाचे सहकार्य बचत गटातील महिलांना मिळत आहे. शहरातील सफाई कामगार इतर कर्मचारी व नागरिकांना ही मास्क उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे. लॉकडाऊन स्थितीमध्ये नगरपरिषदेतील सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांना मास्क पुरवण्यासाठी सोनिया नगर येथील बचत गटाला काम देण्यात आले. मात्र संचारबंदीमुळे मार्गदर्शन कसे करावे, हे समजत नव्हते. त्यामुळे युट्युब वरून त्यांना मास्क बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. गटातील महिलांनी अतिशय चांगल्या दर्जाचे कॉटनचे मास्क तयार केलेले आहेत. गरजेनुसार नागरिकांसाठीही उपलब्ध करून देता येईल.

Last Updated : Apr 10, 2020, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.