ETV Bharat / state

खळबळजनक..! चंद्रपूरमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एकमेकांचा विरह सहन न झाल्याने विवाहित महिलेने प्रियकरासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सुनिता निळे व राजेश गेडाम अशी या दोघांची नावे आहेत.

author img

By

Published : Jul 15, 2019, 1:14 PM IST

Updated : Jul 15, 2019, 2:10 PM IST

विवाहित महिलेची प्रियकरासह आत्महत्या

चंद्रपूर - एकमेकांचा विरह सहन न झाल्याने विवाहित महिलेने प्रियकरासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिता निळे आणि राजेश गेडाम अशी त्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांचा तपास सुरू असून, दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सुनिता निळे हिचे नकोडा येथील अमित निळे यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना ६ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, सुनीता ही नागपूर येथील राजेश गेडाम यांच्या प्रेमात होती. राजेशचेही लग्न झाले होते. मात्र, सुनीता आणि राजेश हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते, की त्यांना एकमेकांचा विरह असहनीय झाला. याच भावनेपोटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली.

रविवारी राजेश हा नागपूरहून सुनीताला भेटायला चंद्रपूरला आला होता. दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आणि आत्महत्येचा निर्णय घेतला. चंद्रपूर-घुग्घुस राज्य महामार्गावरील शेणगाव येथून काही अंतरावर असलेल्या मत्ते यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना समोर आली. घटनास्थळी राजेश गेडाम याची दुचाकी (एम.एच. ४० एई. १४३५) आढळली. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांचा तपास सुरू आहे.

Intro:चंद्रपुर : त्या दोघांचेही वेगवेगळ्या स्थळी लग्न झाले होते. याला अनेक वर्षेही लोटली. मात्र, एकमेकांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच प्रेमाने कळस गाठला आणि दोघांनीही आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.Body:सुनिता निळे हिचे लग्न नकोडा येथीलअमित निळे यांच्याशी झाले. त्यांना सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र सुनीता ही नागपूर येथील राजेश गेडाम याच्या प्रेमात होती. राजेशचे ही लग्न झाले होते. मात्र सुनीता आणि राजेश हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इतके की एकमेकांचा विरह त्यांना असहनीय झाला. याच भावानेपोटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. रविवारी राजेश हा नागपूरहून सुनीताला भेटायला आला. दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आणि आत्महत्येचा निर्णय घेतला. चंद्रपुर-घुग्घुस राज्य महामार्गावरील शेणगाव येथून काही अंतरावर असलेल्या मत्ते यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या दोघांनी आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना समोर आली. घटनास्थळी राजेश गेडाम याची दुचाकी MH 40 AE 1435 आढळली. या प्रकरणी घुग्घुस पोलीसांचा तपास सुरू आहे. उत्तरीय तपासणी साठी दोघांचे मृतदेह पाठविण्यात आले आहे.
Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 2:10 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.