चंद्रपूर : Maratha Reservation : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात देखील पडली आहे. (Chandrapur News) मराठा समाजाचं जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करत असल्याचं ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
ओबीसी महापंचायतीचं आयोजन : (Maratha Reservation Protests) जालन्यात झालेला लाठीचार्ज याचा ओबीसी समाजानं निषेध केला आहे. सरकारनं निजामशाहीमधील कुणबी समाजाचे दाखले द्या त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देणार असं सांगितलं. मात्र मराठा समाजाकडं निजामशाहीचा पुरावा नसल्यानं, त्यांना ओबीसी समाजात सामील करावं अशी मागणी केली जात आहे. याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघानं चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचं आयोजन (Maha Panchayat March) केलं. या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचं वस्तीगृह तात्काळ सुरू करा. तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये, असे ठराव मांडण्यात आले आहेत.
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या अशी मागणी ओबीसी समाजानं केली आहे. आधीच ओबीसी समाजात तब्बल 423 च्यावर जाती आहेत. त्यामध्ये आता मराठा समाज आला तर ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. जर त्यांच्याकडं निजामशाहीचे दाखले असतील, तर त्यांना आरक्षण द्या. पण सरसकट नको, मराठा समाजानं आजपर्यंत मोठे मोर्चे काढले. परंतु आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली असल्याचंही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अन्नत्याग आंदोलन करणार : ( OBC Protest ) ओबीसी समाजाला मोठा मोर्चा काढायचा आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका लावा. ओबीसी महापंचायतीमध्ये सोमवार 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
17 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा महामोर्चा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. तर ओबीसी महापंचायतीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तेली महासंघ, माळी महासंघ व विविध राजकीय पदाधिकारी सहित एकूण 20 संघटना सामील झाल्या होत्या. पंचायतमध्ये बबनराव फंड, अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, संदीप गिरे, सतीश भिवगडे, पुरुषोत्तम सातपुते, अरुण तीखे, शाम लेडे, रजनी मोरे, संजय घाटे, अनिल धानोरकर, सूर्यकांत, खनके मनीषा बोबडे, गणेश आवारी, अविनाश पाल, निलेश बेलखेडे, रवींद्र टोंगे, राजेंद्र खांडेकर, अजय बलकी, गोविंदा पोडे, पारस पिपलकर, हितेश लोडे, किशोर टोंगे, रवी गुरनूले अनिल डहाके, सतीश मालेकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा -
- Ashok Chavan On Maratha Reservation : सरकारनं दाखवलंय गाजर, 'त्याशिवाय' मराठा आरक्षण मिळू शकत नाही; अशोक चव्हाणांचा दावा
- OBC leaders on Maratha quota : मराठा ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांची काय आहे भूमिका? जाणून घ्या सविस्तर
- Vijay Wadettiwar Reaction : ...तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा, विजय वडेट्टीवार यांची मागणी