चंद्रपूर - राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाचा आज( 27 जानेवारी) दुपारी 12:30 च्या सुमारास मृत्यू झल्याची घटना घडली आहे. मंगेश मधुकर जक्कुलवार( वय 35), असे मृत शिपायाचे नाव आहे. विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा - पोंभुर्ण्यात गिट्टीने भरलेला भरधाव ट्रक घरात घुसला; दोन जण चिरडले
प्राथमिक माहितीनुसार, रात्र पाळीत कर्तव्य पार पाडल्यानंतर सकाळी राजुरा बामणी मार्गावरील नवीन रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रीज जवळ मंगेश यांचा मृतदेह आढळला. तत्पूर्वी त्यांनी सर्वांसोबत चांगल्या पद्धतीने संवाद साधला होता, अशीही माहिती मिळत आहे. त्यांनी विष प्राशन केले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा ठाण्याचे निरीक्षक एम. एम. कासार यांच्यासह एक पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाला होता.