ETV Bharat / state

तेलंगणा सरकारने बंद केलेला मार्ग महाराष्ट्रातील उपसरपंचाने केला सुरू - telangana maharashtra border news

तांदळाची तस्करी रोखण्यासाठी सिरपूर प्रशासनाने गोंडपीपरी-सिरपूर मार्गच खोदून काढला होता. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद पडली. दोन राज्यांचा सबंध तूटला. अशात पोडसा येथील उपसरपंचानी तेलंगणा प्रशासनाने मार्गात खोदलेला खड्डा बुजविला अन मार्ग पुर्ववत सुरू केला आहे.

Maharashtra sarpanch starts road which is closed by telangana government
तेलंगणा सरकारने बंद केलेला मार्ग महाराष्ट्रातील उपसरपंचाने केला सूरू
author img

By

Published : Oct 2, 2020, 10:57 PM IST

राजूरा - तेलंगणातून होणारी तांदळाची तस्करी रोखण्यासाठी तेलंगणा प्रशासनाने गोंडपीपरी-सिरपूर मार्गच खोदून काढला होता. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद पडली. दोन राज्यांचा संपर्क तुटला. अशात पोडसा येथील उपसरपंचानी तेलंगणा प्रशासनाने मार्गात खोदलेला खड्डा बुजविला अन मार्ग पुर्ववत सूरू केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला पोडसा घाटावरील आंतरराज्यीय पुल चर्चेत आला आहे. तेलंगणातील सिरपूर भागातून स्वस्तधान्य दुकानातील तांदूळ महाराष्ट्रातील पोडसा येथे विक्रीला आणला जातो. तांदळाची तस्करी रोखण्यासाठी सिरपूर प्रशासनाने नानाविध उपाययोजना अमलात आणल्या. पुलाजवळ चौकी बसविली. कारवाईचा सपाटा सुरू केला; मात्र तस्करी थांबली नाही. अखेर वैतागलेल्या सिरपूर प्रशासनाने त्यांचा हद्दीत येणारा मार्गच खोदून काढला. परिणामी वाहतूक ठप्प झाली. दोन राज्यांचा संपर्क तुटला होता. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरीकांनी सिरपूर प्रशासनाला मार्ग पुर्ववत करण्याची विनंती केली. मात्र सिरपूर प्रशासनाने त्याकडे दूर्लक्ष केले. अखेर आज पोडसा येथील उपसरपंच देविदास सातपुते यांनी प्रशासनाने खोदलेला खड्डा बुजविला. त्यामुळे सिरपूर-गोंडपिपरी मार्ग पुर्ववत सुरू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.