चंद्रपूर - येथील गोंडपिपरी येथे रात्री २ वाजता सापळा रचून केलेल्या कारवाईत ६८ हजार ४०० रुपयाचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. दिपक ऊर्फ चन्ना तानाजी चन्नेकार या आरोपीसह एकून ४ लाख ६८ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आला. ही दारू निलेश बानोले याची असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
हेही वाचा- 'नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जींच्या सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचारात घ्याव्यात'
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात दारू पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार संदिप धोबे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजी चौकात गस्त घातली. काल रात्री २ वाजताच्या सुमारास एक चार चाकी गाडी इंदिरा नगर कडे वळली. तेव्हा त्या गाडीला पोलिसांनी थांबवले. मात्र, चालक व सोबत असलेले साथीदार पसार झाले. मात्र, दिपक ऊर्फ चन्ना तानाजी चन्नेकार (वय ३०) याला पोलिसांनी पकडले.
या गाडीत पोलिसांनी विविध ४ लाख ६८ हजार ४०० रूपयाची दारू मिळून आली. निलेश बानोले पसार झाल्याने गोंडपिपरी पोलीस त्यांच्या शोधात आहेत.