चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील चारगाव गावाशेजारील विहिरीत एक बिबटयाचा बछडा मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम गजभिये या शेतकऱ्याचा विहिरीत हा बिबटयाचा बछडा मृतावस्थेत आढळला. तो 6 महिन्यांचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सिंदेवाही तालुक्यात मानव आणि वन्यजीवातील संघर्ष शिगेला पोचला आहे. वाघ आणि बिबट्याचा येथे अनेकदा मुक्त वावर असतो. यात अनेक नागरिकांचा बळी गेलेला आहे. तर यात वन्यजीव देखील मृत्युमुखी पडले आहेत. त्यात हा बिबट्याचा बछडा विहिरीत आढळ्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे. दरम्यान, या बछड्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.