ETV Bharat / state

चंद्रपुरात पाण्याच्या समस्येचा भडका; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप - पाणी समस्या

चिमूर तालुक्यातील भिसी गावात मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

भिसी ग्रामपंचायत
author img

By

Published : Apr 16, 2019, 9:31 PM IST

Updated : Apr 16, 2019, 11:40 PM IST

चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील भिसी गावात मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महिला सरपंचाना घेराव घालून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

महिलांचा सरपंचांना घेराव

गावात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. गावातील महिलांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी सरपंच आणि उपसरपंचांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात मडके, मातीचे रांजन फोडून आपला रोष व्यक्त केला. तसेच ग्रामपंचायतीला चपला जोड्याचा हार आणि कुलूप लावले.

यावेळी एका मोर्चेकरी महिलेने महिला सरपंच योगिता गोहणे यांच्यावर मारहाणीचा आरोप करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर सरपंच गोहणे यांनी मोर्चेकरी महिलांनी मला मारहाण केल्याची तक्रार दिली. दोन्ही तक्रारींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:चंद्रपुर : मागील 15 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांचा उद्रेक भिसी या गावात पाहायला मिळाला. या महिलांनी महिला सरपंचाचा घेराव करून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.Body:
चिमूर तालुक्यातील भिसी येथील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली व मॉडेल नावाने ओळखली जाणारी ग्राम पंचायत आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू असतांना भिसी येथे मागील १६ दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने भिसी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे जनतेला खूप त्रास होत होता. ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांचा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा धडकला. या ठिकाणी सरपंच व उपसरपंच यांना गावकऱ्यांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. परंतू ग्रामपंचायत पदाधीकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून महीलांनी ग्रामपंचायत कार्यालयात मडके, मातीचे रांजन फोडून आपला रोष व्यक्त करीत ग्राम पंचायत ला चपला जोडे चा हार व कुलूप बांधले.Conclusion:दरम्यान एका मोर्चेकरी महीलेने येथील महीला सरपंच वर मारहाणीचा आरोप लावला व स्थानीक पोलीस ठाण्यात सरपंच योगीता गोहणे यांच्या विरोधात तक्रार दिली. नंतर मोर्चा करी महीलांनी सुद्धा मला मारहाण केल्याची तक्रार सरपंच गोहणे यांनी दिली. दोन्ही तक्रारींची चौकशी सुरू असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
Last Updated : Apr 16, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.