ETV Bharat / state

suicide Attempt In Chandrapur: बनावट दारूच्या आरोपीने केले विषप्राशन; उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील घटना - suicide Attempt In Chandrapur

बनावट देशी दारूचा कारखाना प्रकरणातील फरार आरोपीने आत्मसमर्पण केले. मात्र याच दरम्यान त्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उत्पादन शूल्क विभागाच्या कार्यालयातच ही घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क विभाग तपासाची दिशा बदलण्यासाठी आरोपींचा प्रयत्न असल्याचे सांगत आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. राजू श्यामराव मडावी वय २६, राहणार बाबुपेठ असे या आरोपीचे नाव आहे.

suicide attempt
आरोपीने केले विषप्राशन
author img

By

Published : Feb 11, 2023, 9:57 AM IST

चंद्रपूर: दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. यानंतर जिल्ह्यात बनावट दारू विक्री करणारे रॅकेटसुद्धा सक्रिय झाले. मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका शेळीपालन केंद्रावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू होता. येथून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात बनावट दारू विकण्याची यंत्रणा तयार करण्यात आली. मात्र सिंदेवाही येथे बनावट दारु आढळली आणि त्याचा सुगावा घेत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चितेगाव येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकत पर्दाफाश केला.

विभागाच्या पथकाकडून शोध सुरू: या प्रकरणात गुरू संग्रामे आणि उमाजी झाडे या दोघांना उत्पादन शूल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तर, पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तिघे घटनेनंतर फरार झाले. या तिघांचा उत्पादन शूल्क विभागाच्या पथकाकडून शोध सुरू होता. परंतु पंधरा दिवस लोटूनही हे तिघे हाती लागले नाही. उत्पादन शूल्क विभागाने फरार आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत केले. फरार आरोपी राजू मडावी याच्यासह बाबुपेठ परिसरातील कार्तीक घोटेकर याचेही नाव या प्रकरणात समोर आले. त्यानंतर उत्पादन शूल्क विभागाच्या पथकाने कार्तीकचे वडील पुंडलिक घोटेकर वय ५० यांनी घरून उचलून नेत मारहाण केली.

कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न: वरोरा येथे चायनिजच्या दुकानात काम करणाऱ्या आरोपी राजूचा भाऊ सुरेश मडावी यालासुद्धा पोलिसांनी उचलून नेत बेदम मारहाण केली. तसेच गौरव निदेकर वय २३, राहणार बाबुपेठ यालासुद्धा पोलिसांनी तपासाच्या नावाखाली मारहाण केली. कुटुंबीयांना वारंवार त्रास दिला जात असल्याने आरोपी राजू मडावी हा स्वता शरण जाण्यासाठी उत्पादन शूल्क विभागाच्या कार्यालयात गेला. त्यानंतर तेथील पोलिसांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या या कृत्यानंतर राजू मडावी याने त्या कार्यालयातील बाथरूममध्ये उंदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. फरार आरोपीने चक्क कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यानंतर या आरोपीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उत्पादन शूल्क विभागाच्या तपास मोहीमेवरच शंका उपस्थित केली जात आहे.

उत्पादन शुल्क विभागाने आरोप फेटाळले: बनावट देशी दारूचा कारखाना चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात फरार आरोपींना जामीन मिळूनच शकत नाही. त्यामुळे त्या तिघांची अटक ही अटळ आहे. त्यामुळे आरोपी राजू मडावी याने हे सर्व नाट्य स्वता घडवून आणले आहे. कार्यालयात आल्यानंतर त्याला कुणीही मारहाण केलेली नाही. एवढेच नाही, तर त्याने कार्यालयात उंदीर मारण्याचे विष घेतले नसून, तो बाहेरच कुठेतरी विष प्राशन करून आला. या सर्व प्रकारातून तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

मुख्य आरोपी वर्मा अद्याप पसार: पवन वर्मा ह्या बनावट दारूच्या कारखान्याचा मुख्य सूत्रधार होता. त्याच्याच मदतीने मध्यप्रदेश येथील शेकडो लिटर इथिल अल्कोहोल आणण्यात आले. ज्याचा बनावट दारू निर्माण करण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र वर्मा हा अद्याप फरार आहे. तो वारंवार आपले ठिकाण बदलवत आहे, त्यामुळे तो अद्याप हाती लागलेला नाही. जोवर त्यास अटक होत नाही तोवर ह्या रॅकेटचा उलगडा होणार नाही, त्यामुळे त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: Mumbai Crime 2 आफ्रिकन तरुणांकडून 11 लाखांचे ड्रग्ज जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.