ETV Bharat / state

चंद्रपुरात गुरुवारी 1064 कोरोनामुक्त; 1741 पॉझिटिव्ह, तर 29 मृत्यू

सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

चंद्रपुरात गुरुवारी 1064  कोरोनामुक्त
चंद्रपुरात गुरुवारी 1064 कोरोनामुक्त
author img

By

Published : Apr 30, 2021, 7:07 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 1741 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408 झाली आहे. सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

गुरुवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60 व 68 वर्षीय पुरुष,
लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55 व 67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तसेच वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष,
बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष,
कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आत्तापर्यंतचे मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

तसेच बाधित आलेल्या 1741 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, चंद्रपूर तालुका 142, बल्लारपूर 104, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 121, नागभिड 39, सिंदेवाही 116, मूल 123, सावली 39, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 45, राजूरा 98, चिमूर 50, वरोरा 128, कोरपना 87, जिवती 15 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

लस घेण्याचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.